IPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स !

आयपीएलच्या बाराव्या हंगामात या गोलंदाजाला केवळ एक षटकार मारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 09:23 PM IST

IPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स !

चेन्नई, 18 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात कॅरेबियन फलंदाजांचं वादळ गाजत असताना, रोजच्या रोज नवनवीन विक्रमही प्रस्थापित होत आहेत. ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि पोलार्ड यांनी अक्षरशा: गोलंदाजांची पिसं काढली.

मात्र या हंगामात असेही गोलंदाज आहेत ज्यांच्या गोलंदाजीवर एक षटकार मारणंही फलंदाजांना कठीण झालं आहे. असाच एक गोलंदाज म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाबचा फिरकी गोलंदाज मुरूगन अश्विन. अश्विननं आतापर्यंत 108 चेंडू टाकले आहेत, त्यात त्यानं केवळ एक षटकार मारला आहे. त्यामुळं हा हंगामात अश्विन 100हून जास्त चेंडू टाकत केवळ एकच षटकार देणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

मुरूगन अश्विननंतर हैदराबादचा फिरकी गोलंदाज राशिद खान याचा नंबर लागतो. रशिदनं 192 चेंडूत केवळ 2 षटकार मारले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सचा युवा जलद गोलंदाज आवेश खाननं 18 चेंडूत आतापर्यंत एकही षटकार दिला नाही.

एक वर्ष फक्त नेटमध्ये करायचा गोलंदाजी

मुरूगन अश्विन तमिळनाडूचा राहणारा असून, याआधी तो चेन्नई सुपरकिंग्ज संघात होता. दरम्यान, त्यांच्याकडून त्याला एकही सामना खेळता आला नाही. एकवर्ष तो फक्त धोनी, रैना यांना नेटमध्ये गोलंदाजी करायचा. मात्र, 2016मध्ये हा फिरकी गोलंदाजाचं नशीब चमकलं. 2016मध्ये पुणे सुपरजायंटसनं 4.5 कोटींना खरेदी केलं, तेव्हा अश्विनचा बेस प्राईज केवळ 10 लाख होता. त्यानंतर, पंजाब संघानं अश्विनला आपल्या संघात घेतले.

Loading...


VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...