भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला देश, आता इंग्लंडमधून खेळणार क्रिकेट!

भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 07:20 PM IST

भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला देश, आता इंग्लंडमधून खेळणार क्रिकेट!

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यामुळं येत्या काळात बहुतांश क्रिकेटपटूंनी आपला देश सोडत संन्यास किंवा इतर देशांकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आता भारताच्या आणखी एक क्रिकेटपटूचे नाव सामिल झाले आहे. भारतीय संघाबाहेर असलेला मुरली विजयनं शनिवारी राष्ट्रीय संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी उत्सुक नसल्याचे मत व्यक्त केले. विजयनं भारतासोडून आता इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुरली विजय येत्या काळात इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार असून समरसेट या संघाकडून क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडमधून रवाना होण्याआधी विजयनं याबाबत माहिती दिली. विजयनं भारताकडून डिसेंबर 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर विजयला संघात स्थान मिळाले नव्हते.

फॉर्ममध्ये नसल्याचे विजयला बसला फटका

गेल्या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत मुरली विजयला चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 4 सामन्यात 20 धाव ही त्याची सर्वोत्कृष्ठ खेळी ठरली. त्यानं केवळ 18.80च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.

वाचा-दिग्गज गोलंदाज अडकला SEX रॅकेटमध्ये, गर्लफ्रेंड आणि इतर महिलांसोबत घातला धिंगाणा

Loading...

‘मी चार वेळा कमबॅक केला आहे, माझ्यावर कोणताही दबाव नाही’

विजयनं इंग्लंडनं रवाना होण्याआधी, “निश्चित स्वरूपात मला मी प्रयत्न करत राहणार. पण भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही. सध्या मी जे खेळत आहे, त्यात मी समाधानी आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळं तो कसा खेळायचा हे मला माहित आहे. मी असे आधीही केले आहे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-बस कंडक्टरच्या मुलाची 'बेस्ट' कामगिरी, टीम इंडियात निवड; सचिनने केलं होतं कौतुक

भारतीय संघासाठी खेळल्या 61 कसोटी सामने

35 वर्षीय विजयनं 61 कसोटी सामन्यात 38.28च्या सरासरीनं 3982 धावा केल्या आहेत. यात सर्वोश्रेष्ठ धावा 167 आहेत. आता मुरली विजय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळं वाढत्या वयामुळं टीम इंडियात पुनरागमन होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

वाचा-फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...