VIDEO : रोहितचा विक्रम मोडण्यासाठी ‘हा’ 12 वर्षांचा खेळाडू सज्ज

VIDEO : रोहितचा विक्रम मोडण्यासाठी ‘हा’ 12 वर्षांचा खेळाडू सज्ज

2014साली श्रीलंकेविरोधात रोहित शर्माने केलेल्या 264 धावांच्या विक्रमाला मुंबईकर खेळाडूचे आव्हान.

  • Share this:

मुंबई, 17 मार्च :  आयपीएलचा 12वा हंगाम सुरु होण्याआधी आतापासून स्पर्धेची उत्कंठा वाढली आहे. आता नक्की कोणाला सपोर्ट करायचा हा ही प्रश्न असतोच, कारण आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू एकमेकांविरोधात भिडतात. अश्या सगळ्या परिस्थितीत मात्र आता चक्क एका मुंबईकर खेळाडूनेच मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माला आव्हान दिले आहे. या खेळाडूला रोहितचा 264 धावांचा विक्रम मोडायचा आहे. तो खेळाडू म्हणजे 12 वर्षांचा तुषार सिंग. तुषारचा आवडता खेळाडू रोहित शर्मा असून, रोहितने 2014 साली श्रीलंकेविरोधात केलेला 264 धावांचा विक्रम नक्की मोडेन अशी जणु खात्रीच तुषारला आहे, म्हणून तुषारने थेट रोहितलाच आव्हान केले आहे. तुषार सध्या मुंबई इंडियन्स संघाच्या वतीने आयोजित ‘मुंबई इंडियन्स ज्युनिअर’ या स्पर्धेत खेळत आहे. तुषार हा अंडर-12 मुंबई संघाकडूनही खेळतो. मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या व्हिडीओत तुषार आपल्या खेळाविषयी सांगताना दिसतो. यावेळी तुषारने, माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा असून, त्याचा संयमी खेळ मला खुप आवडतो, अशी रोहित शर्माची स्तुतीही तुषारने केली आहे. या व्हिडीओत तुषारने आपल्या क्रिकेटच्या प्रवासाचे वर्णनही केले आहे.2014 साली श्रीलंकेविरोधात रोहित शर्माने ईडन गार्डन स्टेडियमवर 264 धावा करण्याचा विक्रम केला होता. मात्र, ही किमया काही रोहितनं पहिल्यांदा केलेली नाही, तर चक्क तीनवेळा रोहित शर्माने दुहेरी शतक केले आहे, आणि असं करणारा रोहित हा जगातील पहिला खेळाडू आहे. याआधी त्याने 2013ला ऑस्ट्रेलियाविरोधात 209 धावा केल्या होत्या. तर, 2017ला पुन्हा श्रीलंकेविरोधातच 208 धावा केल्या होत्या. दरम्यान याआधी भारताकडून विरेंद्र सहवागने 219 तर, सचिन तेंडूलकरने 200 केल्या होत्या. सध्या रोहित शर्माच्या आयपीएलसाठी मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ आपल्या होम ग्राऊंडवर 24 मार्चला दिल्ली विरोधात खेळेल.

VIDEO: ...जेव्हा मुंबईतल्या रस्त्यांवर धावल्या फोर्ड, रोल्स रॉइस, बेंटली कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या