Elec-widget

IPL 2019 : मुंबईचा विजयरथ रोखला, वानखेडेवर राजस्थानचा रॉयल विजय

IPL 2019 : मुंबईचा विजयरथ रोखला, वानखेडेवर राजस्थानचा रॉयल विजय

राजस्थानचं बाद फेरीतील आव्हान जिवंत.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : जॉस बटलरच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर राजस्थाननं मुंबईचा विजयरथ त्यांच्यात घरात रोखला. राजस्थाननं चार विकेट राखत मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले.राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करत मुंबई संघानं राजस्थानसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखपतीतून सावरत पुनरागमन करत असताना, चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मुंबईकडून डी कॉकनं सर्वात जास्त 52 चेंडूत 81 धावा केल्या आणि बाद झाला. डी कॉकची ही खेळी आणि हार्दिक पांड्यांची शेवटच्या दोन षटकात कलेली फटकेबाजी यामुळं मुंबईनं 188 धावांचा डोंगर उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना, राजस्थानकडून सलमीचे फलंदाजी जॉस बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी आश्वासक सुरुवात केली. बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्याने जोसेफ अल्झारीच्या एका षटकात 17 धावा चोपून काढल्या. घरच्या मैदानावर खेळणारा अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसला. मात्र कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं.

Loading...

रहाणे बाद झाल्यानंतर बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांविरोधात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. अल्झारीने टाकलेल्या 13व्या षटकात बटलरने 6, 4, 4, 4, 4, 6 अशा 28 धावा चोपल्या. या खेळीच्या जोरावर बटलरनं या सामन्याची रुपरेषा बदलली आणि राजस्थानला सामन्याच्या जवळ आणून ठेवले.

What an innings this by @josbuttler. He departs after scoring a well made 89 👏👏 pic.twitter.com/mydP0pboe0


— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2019


पण बटलरच्या एका विकेटनंतर राजस्थानचा संघ एका मागोमाग एक तंबुत परतला.मुंबईकडून कृणार पांड्यानं 3 तर, बुमराहनं दोन विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करत मुंबई संघानं राजस्थानसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखपतीतून सावरत पुनरागमन करत असताना, चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मुंबईकडून डी कॉकनं सर्वात जास्त 52 चेंडूत 81 धावा केल्या आणि बाद झाला. रोहितच्या उपस्थितीत मुंबईचा संघ राजस्थान विरोधात आपल्या घरच्या मैदानात खेळत आहेत. दरम्यान या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ क्विंटन डी कॉकच्या 81 धावांच्या जोरावर मुंबई संघानं धावा केल्या. राजसस्तानकडून जोफ्रा आर्चीनं तीन विकेट घेतल्या.

राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत, मुंबईला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान, मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यामुळे ४.२ षटकातच म्हणजे केवळ २६ चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली. रोहित शर्मानं 32 चेंडूत 47 धावा केल्या पण जेफ्रा आर्चरच्या चेंडूवर बटलरनं उत्तम झेल घेतला आणि फॉर्ममध्ये असलेला रोहित बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि पोलार्डही स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं केवळ 12 चेंडूत मुंबईला लगातार दोन झटके बसले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि डी कॉक यांनी शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली, परंतु डी कॉक 81 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्यानं 11 चेंडूत 28 धावा केल्या, त्याच्य या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं धावांचा डोंगर उभा केला.दरम्यान हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी एक अनोखा विक्रम केला. मुंबईच्या संघानं आपल्या सामन्याचं द्विशतक तर, रोहितनं मुंबईचा कर्णधार म्हणून आपलं शतक पूर्ण केलं. पण या सामन्यात रोहित शर्माच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे.


VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...