मुंबई क्रिकेट संघ खेळणार आज 500वा रणजी सामना

मुंबई क्रिकेट संघ खेळणार आज 500वा रणजी सामना

आता 500व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईची गाठ पडणार आहे ती बडोदे संघाशी.या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबईकडून खेळणार आहे.

  • Share this:

मुंबई,09 नोव्हेंबर: मुंबई क्रिकेटसाठी आज आनंदाची गोष्ट आहे कारण मुंबईचा रणजी क्रिकेट संघ 500वा रणजी सामना खेळणार आहे. या संघाने आतापर्यंत भारताला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहे.

मुंबईचा संघ आपला पहिला सामना 2फेब्रुवारी 1935ला खेळला होता. तो सामना गुजरातच्या संघाविरूद्ध खेळण्यात आला होता.या संघाला 25 कर्णधारांनी आतापर्यंत रणजीकपचे विजेतेपद मिळवून दिलं आहे. आता 500व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईची गाठ पडणार आहे ती बडोदे संघाशी.या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबईकडून खेळणार आहे. आपल्या 400व्या सामन्यात मुंबईने बंगालला हरवलं होतं. 500व्या सामन्यात मुंबईचं नेतृत्व आदित्य तारे करणार आहे. तर समीर दिघे सध्या मुंबईच्या संघाचे कोच आहेत.

आता 500वा सामना मुंबईची टीम जिंकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading