महान फलंदाज व्हायचे असेल तर...सचिननं दिला अर्जुनला गुरुमंत्र

महान फलंदाज व्हायचे असेल तर...सचिननं दिला अर्जुनला गुरुमंत्र

मुंबई टी-20 लीगमध्ये अर्जुन आकाश टायगर्स संघाकडून खेळला.

  • Share this:

मुंबई, 27 मे : आयपीएलनंतर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा कोणता विषय असेल तर तो आहे, मुंबई टी-20 लीग. गेल्यावर्षीपेक्षा या लीगची चर्चा यंदाच्या हंगामात जास्त झाली. यंदाच्या हंगामात आकाश टायगर्सकडून पदार्पणासाठी उतरला तो, महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. यंदाच्या हंगामात अर्जुनला आकाश टायगर्स संघाकडून संधी देण्यात आली होती. त्यानं पहिल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली, मात्र त्यानंतर त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं नेटेकरांनीही त्याच्यावर टीका केली. मात्र सचिन तेंडुलकरनं त्याला मोलाचा सल्ला देत, आयुष्य़ात चोरट्या धावा घेऊ नकोस. आयुष्यात काहीही कर पण शॉर्टकट घेऊ नको. मला माझ्या बाबांनी हाच सल्ला दिला होता, तोच मी अर्जुनला दिला आहे. अर्जुनला 5 लाखांना आकाश टायर्गस संघाने विकत घेतले होते.

यावर सचिननं,''टी-20 लीग हा खुप चांगला प्लॅटफॉर्म आहे, सुरुवात करण्यासाठी. कारण तुम्हाला खरी परिस्थिती कळते. आयुष्यात पुढे जाणे खुप महत्त्वाचे असते. अर्जुन खुप भावनिक खेळाडू आहे. त्याबाबत मी त्याला सल्ला देऊ शकत नाही मात्र. त्याच्या चुका त्याला दाखवू शकतो", असेही सचिन म्हणाला. दरम्यान, IPLप्रमाणेच मुंबई टी20 लीग मध्येही वाद निर्माण झाला. शनिवारी खेळण्यात आलेल्या आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला झाला तसाच दंड फलंदाजी करणाऱ्या संघाला करायला हवा असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं.

सोबो सुपरसोनिक्सच्या संघाने 15 षटकांपर्यंत बिनबाद 158 धावा झाल्या होत्या. त्यावेळी फलंदाज हर्श टँकला स्नायुत वेदना जाणवल्याने डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जय बिश्टाने एक धाव घेतली. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुन्हा बिश्टा स्ट्राइकला न येता टँक खेळत होता. ही गोष्ट मैदानावरील खेळाडू आणि पंचांच्याही लक्षात आली नाही. टँक पहिल्याच चेंडूवर बाद झाला तेव्हा पंचांना फलंदाजांनी स्ट्राइक बदलला नसल्याचं लक्षात आलं. त्यावेळी डेड बॉल दिल्याने आकाश टायगर्सला विकेट मिळाली नाही. खरंतर स्ट्राइक न बदलणं ही फलंदाजांची चूक होती.

दरम्यान , अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली.

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा लागू होणार ICCचे 7 नियम

उमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन?, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 27, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading