आयपीएलमुळे मुंबई पोलिसांनी कमावले 31.5 कोटी !

तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची मात्र १३ कोटी ४१ लाख ७४ हजार १७७ इतकी थकबाकी आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2018 05:39 PM IST

आयपीएलमुळे मुंबई पोलिसांनी कमावले 31.5 कोटी !

मुंबई, 04 जून : आयपीएल बंदोबस्तातून मुंबई पोलिसांना  तब्बल साडे एकतीस कोटी मिळाले आहे.  तर मुंबई किक्रेट असोसिएशनकडे १३ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे.

गेल्या १० वर्षात मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांसाठी दिलेल्या बंदोबस्तातून तब्बल साडेएकतीस कोटी रुपये कमावले आहेत. तर मुंबई किक्रेट असोसिएशनकडून मुंबई पोलिसांना १३ कोटी ४१ लाख रुपये येणे बाकी आहेत.  आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मुंबई पोलिसांना माहितीच्या अधिकारात याबद्दलची विचारणा केली होती. तर आयपीएल तसंच फुटबाॅल आणि मॅरथाॅनला दिलेल्या बंदोबस्तातून मुंबई पोलिसांना साडेएकोणचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत.

२००८ साली आयपीएल सुरू तेव्हापासून २०१८ म्हणजे यावर्षी पर्यंत मुंबई पोलिसांना या स्पर्धेला दिलेल्या बंदोबस्ताकरता ३१ कोटी ६७ लाख, ९४ हजार ७३३ रुपये मिळाले आहेत. तर फुटबाॅल, मॅरेथाॅन या स्पर्धा मिळून ३९ कोटी ६८ लाख ८९ हजार १६१ रुपये मिळाले आहेत.

तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची मात्र १३ कोटी ४१ लाख ७४ हजार १७७ इतकी थकबाकी आहे. यात अनेक आंतरराष्ट्रीय सामने तसंच २०१६ साली झालेल्या टी २० वर्ल्डकपचा समावेश आहे. २०११ साली झालेल्या वर्ल्डकपचे २ कोटी ६५ लाख रुपये एमसीएनं २०१६ साली दिले होते.

Loading...

एमसीएची थकबाकी असूनही आंतरराष्ट्रीय सामन्यांना पोलीस संरक्षण हे मुंबई किक्रेट असोसिएशनचे अध्यक्ष राजकीय नेते असल्यामुळेच मिळत असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...