News18 Lokmat

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर IPL मॅच, गोळीबाराची शक्यता

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येऊ शकतं. सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 10:01 AM IST

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर IPL मॅच, गोळीबाराची शक्यता

मुंबई, 12 एप्रिल : भारतात सुरू असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येऊ शकतं. सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशभरात सध्या क्रिकेटप्रेमी आयपीएल सामन्यांचा आनंद लुटत आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण अशातच दहशतवादी हल्ल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सजक झाल्या आहेत.

कोण-कोणत्या स्थळांना केलं जाऊ शकतं टार्गेट?

IPL मध्ये खेळत असलेल्या क्रिकेटर्सच्या बसला लक्ष्य केलं जाऊ शकतं

खेळाडू थांबतात ती हॉटेलही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

Loading...

दरम्यान, अलर्ट जारी करत मुंबई पोलिसांनी आता सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. स्टेडिअम, खेळाडूंची बस, हॉटेल या सर्व यंत्रणेकडून ठिकाणी आता अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.


VIDEO: विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसे कार्यकर्त्यांनी नराधम शिपायाला दिला चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Apr 12, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...