Home /News /sport /

राहुल द्रविडच्या Viral Video मध्ये मुंबई-नागपूर पोलिसांची एन्ट्री, म्हणाले...

राहुल द्रविडच्या Viral Video मध्ये मुंबई-नागपूर पोलिसांची एन्ट्री, म्हणाले...

राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) एका जाहिरातीमुळे इंदिरानगर का गुंडा सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. राहुल द्रविडच्या या जाहिरातीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 11 एप्रिल : राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) एका जाहिरातीमुळे इंदिरानगर का गुंडा सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे. कायमच शांत स्वभावामुळे ओळखला जाणारा राहुल द्रविड या जाहिरातीत भडकलेला दिसत असल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. राहुल द्रविडच्या व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीनंतर मुंबई आणि नागपूर पोलिसांनीही यात उडी घेतली आहे. सोशल मीडियावर मुंबई आणि नागपूर पोलिसांनी राहुल द्रविडच्या जाहिरातीचा फोटो वापरून सामाजिक संदेश दिला आहे.
  मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, त्यामुळे जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे. 'मास्क, जेव्हा कोरोना व्हायरस तुमच्या जवळ येत असतो,' असं कॅप्शन मुंबई पोलिसांनी द्रविडचा फोटो शेयर करत दिलं आहे. तर इंदिरानगर असो किंवा दुसरा कोणताही भाग असो, तुम्ही शांतच राहा, असं नागपूर पोलीस म्हणाले आहेत.
  रोड इंदिरानगरचा असो किंवा सुरतचा गुंडगिरी कुठेही चालणार नाही, असं कॅप्शन देत सूरत पोलिसांनी ट्वीट केलं आहे. राहुल द्रविडच्या या व्हिडिओवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल द्रविडचं हे रूप आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचं विराट कोहली म्हणाला.
  Published by:Shreyas
  First published:

  पुढील बातम्या