मुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर धडाकेबाज विजय

मुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर धडाकेबाज विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला.

  • Share this:

14 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

बंगळुरूने दिलेल्या 143 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत दयनीय झाली. केवळ 7 धावांवरच मुंबईचे 4 खेळाडू बाद झाले होते. यंदाच्या आयपीएलमधला पहिलाच सामना खेळणारा फिरकी गोलंदाज सॅम्यूअल ब्रद्रीने घातक गोलंदाजी करत या आयपीएलमधील पहिल्या हॅटट्रिकची किमया केली.

त्यानंतर मैदानात आलेल्या केरॉन पोलार्डला या सामन्यात सूर गवसला. त्याने फटकावलेल्या अर्धशतकाने बद्रीच्या कामगिरीवर पाणी फिरवलं. पोलार्डनं 47 बाॅल्समध्ये 70 रन्स केले. पोलार्डला युजवेंद्र चहलने डिव्हिलिअर्सकरवी कॅच केलं तोपर्यंत मुंबईच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. या खेळीत पोलार्डने 5 सिक्स आणि 3 फोर ठोकले. त्याला कुणाल पांड्याने चांगली साथ दिली, पांड्याने नाबाद 37 रन्स केले.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम बॅटिंगं आमंत्रण दिलं. दुखापतीनंतर मैदानात आयपीएलची पहिलीच मॅच खेळणा-या विराट कोहलीने साऊदीच्या एकाच ओव्हरमध्ये जबरदस्त सिक्सर आणि दोन फोर मारत आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली.

मुंबई इंडियन्सच्या टीमकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम बॉलिंग केली. हार्दिक पांड्याने 2 ओव्हर्समध्ये केवळ 9 रन्स देत एक विकेट घेतली.

First published: April 14, 2017, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading