मुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर 'राॅयल' विजय,गुणतालिकेतही अव्वल स्थानी

मुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर 'राॅयल' विजय,गुणतालिकेतही अव्वल स्थानी

रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आणखी एक मॅच खिश्यात घातली

  • Share this:

01 मे : रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने 5 विकेटने राॅयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आणखी एक मॅच खिश्यात घातली.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या 162 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. रोहित शर्माने अखेरच्या ओव्हरच्या दोन बाॅलमध्ये 2 रन्सची गरज असताना शानदार चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने 37 बाॅल्समध्ये 6 चौकार आणि 1 सिक्स लगावत नाबाद 56 रन्स केले.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची इनिंग

मुंबई इंडियन्सने बंगळुरु टीमचे 8 गडी बाद करत 162 रन्सवर रोखलं. मुंबईकडून मॅक्लिंघनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्यात. तर क्रुणाला पांड्याने 2 विकेट घेतल्यात. बंगळुरुकडून एबी डिविलियर्सने 27 बाॅल्समध्ये 4 चौकार आणि 4 सिक्स लगावत  सर्वाधिक 41 रन्स केले. तर पवन नेगीने 35 आणि केदार जाधवने 28 रन्स केले.

या विजयासह मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचली आहे. मुंबई इंडियन्सने 10 मॅचपैकी 8 मॅच जिंकून 16 पाॅईंटची कमाई केलीये. तर 10 पैकी 7 मॅच जिंकत दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. आणि तिसऱ्या स्थानावर हैदराबाद आणि चौथ्या स्थानावर पुणे आहे.

First published: May 1, 2017, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading