पुण्याची फायनलमध्ये धडक, मुंबई इंडियन्सला आणखी एक संधी

धोणीची तडाखेबाज फलंदाजी आणि वी.सुंदरच्या घातक गोलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इंडियन्सचा 20 रन्सने पराभव केलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2017 12:19 AM IST

पुण्याची फायनलमध्ये धडक, मुंबई इंडियन्सला आणखी एक संधी

16 मे : धोणीची तडाखेबाज फलंदाजी आणि वी.सुंदरच्या घातक गोलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इंडियन्सचा 20 रन्सने पराभव केलाय. या विजयासह पुणे टीमने फायनलमध्ये धडक मारली असून मुंबईकडे आणखी एक संधी बाकी आहे.

आयपीएल 10 व्या हंगामातील पहिली प्लॅआॅफ मॅच पार पडली. पुणे टीमने पहिली बॅटिंग करत मुंबईसमोर 163 रन्सचं टार्गेट दिलं. मात्र, बलाढ्य मुंबई इंडियन्स 142 रन्सवर गारद झाली. मुंबई इंडियन्सचे सलामीचे बॅटसमॅन सपेशल अपयशी ठरले. कॅप्टन रोहित शर्मा अवघा एक रन करून आऊट झाला. त्याच्यापाठोपाठ अंबाती रायडूही आऊट झाला. तर कायरन पोलार्ड 7 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने टीमची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तोही 14 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर पार्थिव पटेलने झुंज दिली पण तीही अपयशी ठरली. संपूर्ण टीम 142 रन्सवर आऊट झाली.

या विजयासह पुणे टीम फायनलमध्ये पोहचलीये. तर मुंबईला फायनल गाठण्यासाठी पात्र फेरीत खेळावं लागणार आहे. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स किंवा हैदाराबादच्या टीमशी लढत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 12:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...