नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्जबरोबर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३ गडी राखून सामना जिंकत गुणतालिकेत (IPL Points Table) अग्रस्थानी झेप घेतली. सोमवारच्या या सामन्यामधील दोन्ही संघ आधीच बाद फेरीत म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहचले असल्याने या सामन्यातील विजय हा गुणतालिकेमध्ये अव्वल ठरणारा संघ निश्चित करण्यासाठी होता. मात्र आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MIvsRR) होणाऱ्या सामन्याडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दोन्ही संघांना स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी हा सामना खेळावा लागणार आहे.
आयपीएलमध्ये(IPL 2021) दोन्ही संघासाठी समीकरणे सारखीच आहेत. दोन्ही संघाना उर्वरीत दोन सामने जिंकण्यासोबत धावगती चांगली ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. रॉयल्सचा रन रेट०.३३७ आहे तर, दिल्ली विरुद्ध निराशाजनक कामगिरीनंतर मुंबईचा नेट रन रेट -०.४५३ आहे. तसंच संघ सातव्या स्थानी आहे.
IPL2021; माजी क्रिकेटपटूचे धोनीच्या 'त्या' निर्णयावर मजेशीर ट्विट
मंगळवारी सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल. पण जिंकणाऱ्या संघांसाठी देखील आव्हान सोपे नसेल. कारण, कोलकाता नाईट रायडर्स पुढील सामन्यात जिंकल्यास ते 14 गुणांवर पोहोचतील आणि त्यांचा रन रेट +0.294 आहे. यातच मुंबई इंडियन्सला दोन्ही सामने 200 धावांच्या फरकाने जिंकावे लागतील. तरच रोहितच्या संघाला प्ले-ऑफ (play off )मध्ये स्थान मिळू शकेल.
मुंबई इंडियन्सला पात्र ठरण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर त्यांच्या प्लेऑफच्या आशा दुसऱ्या संघावर निर्भर राहतील. तांत्रिक दृष्ट्या मुंबईने हा सामना गमावल्यानंतर पंजाब आणि राजस्थानचा त्यांच्या उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभव झाल्यास मुंबईला संधी मिळू शकते. मात्र आजचा सामन्यामध्ये एकच विजेता ठरणार असल्याने मुंबई किंवा राजस्थान हा एकच संघ आजच्या सामन्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहणार आहे.
IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणं पडलं महागात, आली पश्चातापाची वेळ
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा हा 13 वा सामना असणार आहे. सध्या मुंबईच्या खात्यात पाच विजय आणि सात पराभवंसहीत 12 सामन्यांत 10 गुण आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या नावावरही मुंबई इतकेच गुण असून यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकर फलंदाजांकडून त्यांना पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानी आहे. 12 सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला असून 10 गुणांसहीत ते निव्वळ धावगतीच्या जोरावर समान म्हणजेच प्रत्येक 10 गुण असूनही मुंबईहून एक स्थान वर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians