मुंबई, 10 एप्रिल : रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या कॅरन पोलार्डनं तुफान फलंदाजी करत मुंबईला सलग तिसरा सामना जिंकून दिला. पोलार्डनं 31 चेंडूत 83 धावा केल्या. तर, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ गेली.
There's no catching that!
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2019
KIERON POLLARD #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #MIvKXIP pic.twitter.com/1Pgg0ThJvZ
पोलार्डच्या 83 धावांच्या जोरावर मुंबईनं पंजाबला हरवले. तर, जोसेफनं सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत काही मोठे शॉट मारत पोलार्डला मदत केली. तर आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या सॅम करनची या सामन्यात पोलार्डनं चांगलीच धुलाई केली.
That's a FIFTY for the big man @KieronPollard55 #MI 158/6 after 17 overs pic.twitter.com/UFPSEqSDV7
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2019
दरम्यान टॉस जिंकत पोलार्डनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलनं मुंबईच्या गोलंदाजांवर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यास सुरूवात केली आणि पंजाबनं 198 धावांचा डोंगर मुंबईसमोर उभा केला.
दरम्यान 198 धावांचा पाठलाग करत असताना, रोहित शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सिद्धेश लाड यानं पहिल्याच चेंडूत सिक्सर मारला खरा, पण त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. लाड 15 धावा करत माघारी परतला. त्यामुळं सलामीचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. तर, सिद्धेशनंतर 21 धावा करत सुर्यकुमार यादवंही बाद झाला. तर, चांगल्या लयीत वाटणारा हार्दिक पांड्या उंच शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. तर, कृणाल पांड्या केवळ धावा करत बाद झाला.
पंजाबकडून मोहम्मद शामीनं दोन बळी घेतला तर, कर्णधार आर. अश्विननं एक विकेट घेतली खरी, पण पोलार्डनं त्याचा चांगलाचा समाचार घेतला.
VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण