News18 Lokmat

कोलकाताचा धुव्वा उडवत मुंबईची फायनलमध्ये धडक, आता पुण्याशी टक्कर

या विजयासह मुंबई इंडियन्स अखेर फायनलमध्ये पोहचली आहे. आता फायनलमध्ये मुंबई इंडियन्सची रायझिंग पुणे सुपरजायंटशी लढत असणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 11:51 PM IST

कोलकाताचा धुव्वा उडवत मुंबईची फायनलमध्ये धडक, आता पुण्याशी टक्कर

19 मे : कर्ण शर्मा आणि जसप्रीत ब्रुमाच्या भेदक माऱ्यापुढे घायाळ झालेली कोलकाता टीम आयपीएलमधून बाहेर पडलीये. मुंबई इंडियन्सने 6 विकेटसने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारलीये.

आयपीएलच्या दुसऱ्या पात्र फेरीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये फायनलसाठी लढत रंगली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या रणनीतीपुढे कोलकाता टीम अपयशी ठरली.

पहिली बॅटिंग करणारी कोलकाता टीम अवघ्या 107 रन्सवर गारद झाली. कोलकाता टीमकडून सुर्यकुमार यादव याने सर्वाधिक 31 रन्स केले. तर इशांक जग्गीने 28 रन्स केले. कॅप्टन गौतम गंभीर 12 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.  मुंबई इंडियन्सकडून करन शर्माने 4 तर जसप्रीत ब्रुमाने 3 विकेट घेतल्या. तसंच मिचेल जाॅन्सनने 2 विकेट घेतल्यात.

मुंबई इंडियन्सपुढे असलेलं 108 रन्सचं हे माफक आव्हान अवघ्या 13 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. क्रुणाल पांड्याने सर्वाधिक नाबाद 45 रन्स केले. या विजयासह मुंबई इंडियन्स अखेर फायनलमध्ये पोहचली आहे. आता फायनलमध्ये मुंबई इंडियन्सची रायझिंग पुणे सुपरजायंटशी लढत असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2017 11:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...