VIDEO : रोहितचा भन्नाट फॅन, त्याच्या एका झलकसाठी पाहा काय केलं

VIDEO : रोहितचा भन्नाट फॅन, त्याच्या एका झलकसाठी पाहा काय केलं

मात्र रोहित शर्माला पाहताच अभिषेक भावूक झाला आणि त्याला अश्रु अनावर झाले.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाची पराभवानं सुरूवात केलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आता सुर गवसला आहे. मागच्या सामन्यात मुंबईनं चेन्नई संघाचा विजयरथ रोखला. मात्र हा सामना रोहितच्या पलटनसोबतच आणखी एकासाठी खास ठरला. रोहित आणि युवराज सिंगच्या या अवलिया फॅननं केवळ त्यांची एक झलक पाहण्यासाठी तब्बल 13 तासांचा रतलाम ते मुंबई असा प्रवास केला.

मध्य प्रदेशातील रतलाम येथे राहणारा अभिषेक बोराना रोहित शर्माचा खुप मोठा चाहता आहे. मुंबई इंडियन्सनं आयोजित केलेली एक स्पर्धा जिंकला, आणि अभिषेक बनला मुंबई इंडियन्स संघाचा सुपरफॅन. वानखेडेवर चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात अभिषेक 13 तासांचा प्रवास करत स्टेडियमवर पोहचला. रतलाम ते मुंबई असा प्रवास करत अभिषेक आणि त्याची बहिण वानखेडेवर पोहोचले. या सुपरफॅनना मुंबई संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी मुंबई संघाचे मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर आपला आदर्श असलेल्या रोहित शर्माला पाहून अभिषेक भावूक झाला आणि त्याला अश्रु अनावर झाले. अभिषेकनं यावेळी आपले आवडते खेळाडू हांर्दिक पांड्या, युवराज सिंह यांच्यासोबतही फोटो काढले.

मुंबई इंडियन्स संघानं टाकलेल्या या व्हिडिओत, अभिषेकनं आपला अनुभव सांगितला. यावेळी मला विश्वासही बसत नाही आहे. हा अनुभव आयुष्यभर माझ्यासोबत राहिल, असे त्यानं सांगितले. तीनवेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघ यंदाही अशी कामगिरी करण्यास सज्ज आहे.

VIDEO: माझं नाव आफताब जहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो

First published: April 6, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading