मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: मुंबई इंडियन्सचे हे दोन खेळाडू बनले रोहितसाठीच डोकेदुखी, हैदराबादमध्ये तुफान फटकेबाजी

Ind vs Aus: मुंबई इंडियन्सचे हे दोन खेळाडू बनले रोहितसाठीच डोकेदुखी, हैदराबादमध्ये तुफान फटकेबाजी

टीम डेव्हिड आणि सॅम्स

टीम डेव्हिड आणि सॅम्स

Ind vs Aus: आयपीएलमध्ये डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिड दोघेही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वात आयपीएल खेळणारे हे दोघेही ऑस्ट्रेलियाकडून खेळताना रोहितसाठीच डोकेदुखी ठरल्याचं चित्र होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

हैदराबाद, 25 सप्टेंबर: हैदराबादच्या तिसऱ्या टी20त टीम इंडियाचं आक्रमण पुन्हा एकदा निष्प्रभ ठरलं. अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारतीय बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाला धावांची सहजपणे लूट करु दिली. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 186 रन्स फटकावले. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर कॅमेरुन ग्रीननं अवघ्या 21 बॉल्समध्ये 7 फोर आणि 3 सिक्सर्ससह 52 धावा फटकावल्या. ग्रीनच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं पॉवर प्लेमध्ये 66 रन्स स्कोअर बोर्डवर लावले होते. पण त्यानंतर अक्षर पटेलच्या स्पेलनं टीम इंडियाला सामन्यात परत आणलं. मात्र त्यानंतर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या दोन बॅट्समनची जोडी जमली आणि त्यांनी हाणामारीच्या ओव्हर्समध्ये फोर आणि सिक्सची बरसात केली.

डेव्हिड-सॅम्सची फटकेबाजी

कॅमेरुन ग्रीनच्या वादळी अर्धशतकानंतरही 14 ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलियाची 6 बाद 117 अशी स्थिती होती. त्यानंतर टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्स ही जोडी जमली. डेविडनं सॅम्सच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 28 बॉल्समध्ये तब्बल 68 धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 186 रन्सपर्यंत मजल मारता आली. डेव्हिडनं 27 बॉल्समध्ये 200 च्या स्ट्राईक रेटनं 54 रन्स ठोकले. त्यात दोन फोर आणि 4 सिक्सर्सचा समावेश होता. तर सॅम्सनं 20 बॉल्समध्ये 1 फोर 2 सिक्ससह नाबाद 28 रन्स केले.

हेही वाचा - Ind vs Aus: अक्षर 'बापू' तुस्सी ग्रेट हो... कांगारुंविरुद्ध पुन्हा चालली अक्षर पटेलची जादू

मुंबई इंडियन्सचे खेळाडू सॅम्स आणि डेव्हिड

आयपीएलमध्ये डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिड दोघेही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वात आयपीएल खेळणारे हे दोघेही ऑस्ट्रेलियाकडून खेळताना रोहितसाठीच डोकेदुखी ठरल्याचं चित्र होतं. मूळचा सिंगापूरचा असलेला टीम डेव्हिड आता ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये डेव्हिडचा समावेश आहे.

First published:

Tags: Cricket news, Mumbai Indians, Rohit sharma, Sports, Team india