मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CPL T20: मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची कॅरेबियन बेटांवर कमाल; सहा बॉलमध्ये ठोकले 5 सिक्स, पाहा Video

CPL T20: मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची कॅरेबियन बेटांवर कमाल; सहा बॉलमध्ये ठोकले 5 सिक्स, पाहा Video

डेव्हाल्ड ब्रेविस

डेव्हाल्ड ब्रेविस

CPL T20: मुंबई इंडियन्सचा अवघ्या 19 वर्षांचा एक खेळाडू आता कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्येही दणकेबाज परफॉर्मन्स देतोय. त्यानं अवघ्या 6 बॉलमध्ये सलग 5 सिक्स ठोकण्याची कमाल केली आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 23 सप्टेंबर: यावर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सनं दक्षिण आफ्रिकेच्या एका युवा खेळाडूला संघात घेतलं होतं. आयपीएलमध्ये त्यानं काही सामन्यात आपल्या आक्रमक बॅटिंगनं छापही पाडली. पण मुंबई इंडियन्सचा तोच खेळाडू आता कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्येही दणकेबाज परफॉर्मन्स देतोय. डेव्हाल्ड ब्रेव्हिय या अवघ्या 19 वर्षांच्या दक्षिण आफ्रिकन बॅट्समननं कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये एका सामन्यात 6 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकण्याचा कारनामा केला आहे. ब्रेव्हिसचे सलग पाच सिक्स सेंट किट्स संघाकडून खेळणाऱ्या ब्रेव्हिसनं त्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्ध ही कमाल केली. त्याला या सामन्यात केवळ 6 बॉल खेळण्याची संधी मिळाली. पण या सहा बॉलमध्ये त्यानं पाच सिक्स ठोकून 500 च्या स्ट्राईक रेटनं 30 धावा फटकावल्या. ब्रेव्हिसच्या या फटकेबाजीमुळे सेंट किट्सनं या सामन्यात 17 ओव्हरमध्ये 4 बाद 94 वरुन 20 ओव्हरमध्ये 6 बाद 163 अशी मजल मारली. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये 69 धावा डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि रुदरफोर्ड या जोडीनं नाईट रायडर्सची गोलंगाजी शेवटच्या तीन ओव्हरमध्ये धुवून काढली. या दोघांनी सिक्सर आणि फोरची आतषबाजी करताना 18 बॉलमध्ये 69 धावा कुटल्या. अकिल हुसेनच्या 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या तीन बॉलवर ब्रेव्हिसने सलग तीन सिक्स ठोकले. त्यानंतर रुदरफोर्ट 20व्या ओव्हरमध्ये 78 धावा काढून बाद झाला. पण ओव्हरचे शेवटच्या दोन बॉलही ब्रेव्हिसनं पुन्हा सीमारेषेपार धाडले. हेही वाचा - Ind vs Aus: नागपूर टी20 होणार की नाही? पाहा भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 आधी Weather Report मुंबई इंडियन्सचा ब्रेव्हिसनं ब्रेव्हिसनं आयपीएलच्या 15व्या मोसमात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. एबी डिव्हिलियर्स सारखी बॅटिंग स्टाईल असल्यानं त्याला बेबी एबीडी असंही म्हटलं जातं. आयपीएल 2022 मध्ये त्यानं 7 मॅचमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटनं 161 रन्स फटकावले होते. आगामी दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्येही मुंबई इंडियन्सच्याच एमआय केपटाऊन संघाचाच तो एक भाग आहे.
First published:

Tags: Cricket, Cricket news, Mumbai Indians, Sports

पुढील बातम्या