IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, 'हा' हुकुमी एक्का माघारी

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, 'हा' हुकुमी एक्का माघारी

पहिल्याच सामन्यात या गोलंदाजानं एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

  • Share this:

मुंबई,15 एप्रिल : प्ले ऑफमध्ये आपलं स्थान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा हुकुमी एक्का असलेला एक गोलंदाज आयपीएलच्या हंगामातूनच माघार घेत आहे.

आपल्या पदार्पणातच आयपीएल गाजवणाऱ्या या गोलंदाजाच्या दुखापतीचा फटका मुंबई संघाला बसणार आहे. हा गोलंदाज आहे अल्झारी जोसेफ. राजस्थान रॉयल्स विरोधात क्षेत्ररक्षण करत असताना, जोसेफच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळं तो बंगळुरू विरुद्धचा सामनाही नाही खेळला.

पदार्पणाच्या सामन्यातच अल्झारीने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी बदली खेळाडू म्हणून अल्झारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. आयपीएलमधील पदार्पणातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जोसेफच्या देशप्रेमाची प्रचिती आली होती. जोसेफ आईच्या निधनानंतर काही कालावधीतच सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर परतला होता. वेस्ट इंडिजने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.

जोसेफच्या जागी बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात लसिथ मलिंगानं संघात पुनरागमन केलं. दरम्यान आजच्या सामन्यात मुबईनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गोलंदाजांना सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीला केवळ 8 धावात बाद करण्यात यश आले. तर, पार्थिक पटेलही 28 धावात बाद झाला. मात्र त्यानंतर मोईन अली आणि एबीनं आक्रमक फलंदाजी करत मुंबईसमोर 171 धावांचा डोंगर उभा केला. मात्र मलिंगानं किफायतशीर गोलंदाजी करत, एबीला लवकरच रोखलं.

VIDEO : राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री!

First Published: Apr 15, 2019 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading