OMG : सचिन नाही तर शेन वॉर्न आहे 'या' मुंबईकर खेळाडूचा आदर्श

OMG : सचिन नाही तर शेन वॉर्न आहे 'या' मुंबईकर खेळाडूचा आदर्श

मुंबईकडून आयपीएल खेळणाऱ्या या फिरकी गोलंदाजाचा आदर्श आहे हा विदेशी खेळाडू.

  • Share this:

चेन्नई, 27 एप्रिल : क्रिकेटच्या विश्वात दोन महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आणि सचिन यांच्यात नेहमीच द्वंद्व युध्द क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं आहे. एवढचं नाही तर या दोघांनी शेकडो खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली.

असाच एक या महान खेळाडूंच्या प्रेरणेने क्रिकेटच्या मैदानात उतरलेला खेळाडू म्हणजे मुंबई संघाचा फिरकी गोलंदाज राहुल चहर. आश्चर्याची बाब म्हणजे राहुल चहरला हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो आणि मुंबई संघाचा सल्लागार सचिन तेंडुलकर आहे. पण राहुलचा आदर्श सचिन नाही तर, महान गोलंदाज शेन वॉर्न आहे.

मुंबईनं चेन्नईच्या विरोधात शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या किंग्जना त्यांच्याच घरात नमवलं. या सामन्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती राहुल चहरनं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलनं एका सेकंदाचाही विचार न करता, शेन वॉर्नच नाव घेतलं.

"मी लहान असताना माझे काका, जे माझे कोच आहेत ते आम्हाला मॅच दाखवायचे. 8 वर्षांचा असल्यापासून मी शेन वॉर्नला पाहत पाहत गोलंदाजी शिकलो", असे स्पष्टीकरणही चहरनं दिलं. राहुल चहर हा मुंबईसाठी महत्वाचा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 8 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. तेही 6.43च्या सरासरीनं. राहुलनं पुणे सुपरजायंटस संघाकडून 2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

VIDEO: 'आम्ही भुजबळांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात

First published: April 27, 2019, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading