पंजाबचा मुंबईवर थरारक विजय

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने 7 धावांनी बाजी मारली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 12:47 PM IST

पंजाबचा मुंबईवर थरारक विजय

12 मे : काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब या मॅचमध्ये पंजाबने मुंबईवर थरारक विजय मिळवलाय.शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने 7 धावांनी बाजी मारली.

शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. मात्र मोहित शर्माने टाकलेल्या अखेरच्या षटकात मुंबईचा संघ केवळ 8 धावाच करू शकला. विशेष म्हणजे मुंबईचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड या षटकात फलंदाजी करत होता,त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र मोहित शर्माच्या घातक गोलंदाजीसमोर पोलार्ड सपशेल अपयशी ठरला.या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकच धाव निघाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर पोलार्डने षटकार ठोकत मुंबईच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. परंतु नंतरच्या चार चेंडूवर मात्र मुंबईला केवळ एकच धाव करता आली.

या विजयासह पंजाबला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यात यश आलं आहे.

याआधी पंजाबने दिलेल्या 230 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचीही सुरुवात वेगवान झालेली. पार्थिव पटेल आणि सिमन्स या सलामी जोडीने सुरुवातीलाच जोरदार फटकेबाजी केली.आणि अवघ्या 5 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या.त्यानंतर आलेले नीतेश राणा आणि रोहित शर्मा हे फलंदाज मात्र अपयशी ठरले.शेवटी कायरन पोलार्डने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत वेगवान अर्धशतक झळकवलं.मात्र तो आपल्या संघास विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही.

सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघाने मुंबईच्या गोलंदाजीचे अक्षरश: कंबरडे मोडले. पंजाबकडून वृध्दिमान साहाने सर्वाधिक ९३ धावा केल्या. तर मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत २१ बाॅल्समध्ये ४७ धावा फटकावल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 12:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...