मुंबई इंडियन्सचं '102 नाॅटआॅऊट', केकेआरवर दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सचं '102 नाॅटआॅऊट', केकेआरवर दणदणीत विजय

  • Share this:

09 मे : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा आपल्याच होमग्राऊंडवर धुव्वा उडवला. मुंबईने केकेआरचा तब्बल 102 धावांनी पराभव केला.

ईडन गार्डनवर कोलकाताने टाॅस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच घातक ठरला. मुंबई इंडियन्सने इशान किशनच्या तडाखेबाज 62 धावांच्या बळावर 210 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून सुर्यकुमार यादव 36, कर्णधार रोहित शर्मा 36 सर्वाधिक धावा केल्यात.

211 धावांचा पाठलाग करणाऱ्या केकेआरची सुरुवात खराब राहिली. सलामीची जोडी सुनील नारीने 4 आणि क्रिस लेन 21 धावा करून चौथ्या षटकापर्यंत बाद झाले. त्यानंतर नितेश राणाने कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तोही 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठा स्कोअर उभा करता आला नाही. अवघा संघ  18.1 षटकात 108 धावांवर गारद झाला.

First published: May 9, 2018, 11:51 PM IST

ताज्या बातम्या