S M L

रोहित-क्रुणालची कमाल, मुंबई इंडियन्सचा पंजाबवर शानदार विजय

Sachin Salve | Updated On: May 5, 2018 12:00 AM IST

रोहित-क्रुणालची कमाल, मुंबई इंडियन्सचा पंजाबवर शानदार विजय

04 मे : मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर शानदार विजय मिळवलाय. मुंबईने सहा गडी राखून पंजाबचा पराभव केला.

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फाॅर्ममध्ये असलेल्या पंजाबच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. ख्रिस गेलने दणदणीत अर्धशतक झळकावले. तर लोकेश राहुलने 24 धावा केल्यात. मॅरक्युस स्टोनीनने नाबाद 29 धावा केल्या. पंजाब निर्धारीत 20 षटकात 174 धावा केल्यात.

विजयासाठी 175 धावांचं आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स मैदानात उतरली. ओपनिंग जोडीने सुर्यकुमार यादवने तडाखेबाज 57 धावा केल्या. तर कृणाल पांड्या 31 आणि कर्णधार रोहित शर्माने नाबाद 24 धावांची खेळी करून टीमला विजय मिळवून दिला. मुंबईने 19 व्या षटकात सहा गडी राखून 176 धावा करून विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 12:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close