S M L

मुंबईने काढला पराभवाचा वचपा, चेन्नईवर दणदणीत विजय

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2018 12:00 AM IST

मुंबईने काढला पराभवाचा वचपा, चेन्नईवर दणदणीत विजय

28 एप्रिल : सतत पराभवामुळे चिंतातूर झालेल्या मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला. मुंबई इंडियन्सने पराभवाची परत फेड करत चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई पहिले बॅटिंग करत 169 धावा केल्यात. चेन्नईकडून सुरेश रैनाने तुफान फटकेबाजी करत नाबाद 75 धावा कुटल्यात. तर अंबाती रायडूने 46 तर महेंद्रसिंग धोनीने 26 धावा केल्यात.

170 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सावध सुरुवात केली. ओपनिंग जोडी सुर्यकुमार यादव  आणि ईव्हीन लेव्हीसने दमदार बॅटिंग केली.  यादवने 44 तर लेव्हीसने 47 धावा केल्या. तर रोहित शर्माने कॅप्टन इनिंग पेश करत 56 धावा केल्या. रोहितच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने 8 गडी राखून चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 12:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close