मुंबई, 5 फेब्रुवारी : महिलांच्या आयपीएलचा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचाइजीने तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रशिक्षकांची घोषणा मुंबई इंडियन्सकडून करण्यात आली आहे. यात शार्लट एडवर्ड्स आणि झुलन गोस्वामी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामीची नियुक्ती केली आहे. तर मुख्य प्रशिक्षकपदी इंग्लंडची माजी कॅप्टन शार्लट एडवर्ड्स असणार आहे. तसंच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून देविका पळशीकरकडे जबाबदारी देण्यात आलीय.
हेही वाचा : धवनला बदनाम करू नको, न्यायालयाने पत्नी आयशाला स्पष्टच बजावले
Paltan, let’s welcome Charlotte, Jhulan, and Devieka to the family 💙#AaliRe #MumbaiIndians #OneFamily @C_Edwards23 @JhulanG10 pic.twitter.com/CTzHOGUM9H
— Mumbai Indians (@mipaltan) February 5, 2023
मुंबई इंडियन्सने ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार शार्लट मुख्य प्रशिक्षक असेल तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेती झुलन गोस्वामी संघाची मेंटॉर असणार आहे. याशिवाय तिच्याकडे गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची जबाबदारीही असणार आहे. देविका पळशीकर या अष्टपैलू क्रिकेटरकडे फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.