IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 'हा' अनोखा विक्रम

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 'हा' अनोखा विक्रम

विजयाची हॅट्रिक केल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडलेला असताना, आज राजस्थान विरोधात सामना जिंकण्यासाठी मुंबई सज्ज.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विजयाची हॅट्रिक केल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडलेला असताना, आज रोहितच्या उपस्थितीत मुंबईचा संघ राजस्थान विरोधात भिडणार आहे. या सामन्यात हुकुमी एक्का ठरला तो किरॉन पोलार्ड.

दुसरीकडं राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थाननं प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. दरम्यान रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली भागीदारी केली. पण रोहित 46 धावांवर बाद झाला.

दरम्यान हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी एक अनोखा विक्रम केला. मुंबईच्या संघानं आपल्या सामन्याचं द्विशतक तर, रोहितनं मुंबईचा कर्णधार म्हणून आपलं शतक पूर्ण केलं.

याआधी सोमरसेट या बीग बॅश लीग मधल्या संघानं 199 सामने खेळण्याचा विक्रम केला होता. पण आता ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 सामने खेळण्याचा हा विक्रम मुंबई इंडियन्सने शनिवारी नावावर केला. तर, रोहितनं कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून आज 100वा सामना खेळला. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 95, तर चॅम्पियन्स ट्वेंटी-20 मध्ये पाच सामन्यांत मुंबईचे नेतृत्व केले होते.

दरम्यान मुंबईची बाजू या सामन्यात वरचड असली तरी, सहा सामन्यांतील पाच पराभवांमुळे राजस्थानची तळाच्या सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थानला बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज त्यांना सामना जिंकावाच लागणार आहे.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 13, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading