S M L

मुंबई इंडियन्सने चारली सनराइजर्सला पराभवाची धूळ

मुंबई इंडियन्सने 4 विकेट राखून सनराइजर्सला पराभूत केलंय

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2017 09:31 AM IST

मुंबई इंडियन्सने चारली सनराइजर्सला पराभवाची धूळ

13 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने सनराइजर्स हैदराबादला धोबीपछाड देत पराभवाची धुळ चारलीये.  मुंबई इंडियन्सने 4 विकेट राखून सनराइजर्सला पराभूत केलंय.

सनराइजर्स टीमने पहिली बॅटिंग करत मुंबई इंडियन्सला 158 धावांचं आव्हान दिलं. नितीश राणाने मॅच विनिंग खेळी करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया भरला. 18.4 ओव्हरर्समध्ये मुंबई इंडियन्सने विजयाचा नोंद केली. नितीश राणाने 36 बाॅल्समध्ये 2 सिक्स आणि 3 चौकार लगावत 45 रन्स केले. तर त्याला क्रुणाल पांड्याने चांगलीच साथ दिली. क्रुणालने 20 बाॅल्समध्ये 3 सिक्स आणि 3 चौकार लगावून मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं.

तर दुसरीकडे सनराइजर्स टीमकडून कॅप्टन डेव्हिड वॅार्नरने 49 रन्स आणि शिखर धवनने 48 रन्स करत शानदार 81 रन्सची नाबाद पाॅर्टनशिप केली. मात्र, डेव्हिड वाॅर्नर आणि शिखर धवन आऊट झाल्यानंतर मधली फळी भार पैलू शकली नाही. त्यामुळे चांगली सुरुवात करून सुद्धा चांगला स्कोअर करू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 09:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close