मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

19000 रन करणारा मुंबईचा दिग्गज झाला ‘या’ टीमचा कोच, 5 महिन्यांपूर्वी सोडले होते पद

19000 रन करणारा मुंबईचा दिग्गज झाला ‘या’ टीमचा कोच, 5 महिन्यांपूर्वी सोडले होते पद

टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज वासिम जाफरचं (Wasim Jaffer) भारतीय क्रिकेट वर्तुळात पुनरागमन झालं आहे.

टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज वासिम जाफरचं (Wasim Jaffer) भारतीय क्रिकेट वर्तुळात पुनरागमन झालं आहे.

टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज वासिम जाफरचं (Wasim Jaffer) भारतीय क्रिकेट वर्तुळात पुनरागमन झालं आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै: टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज वासिम जाफरचं (Wasim Jaffer) भारतीय क्रिकेट वर्तुळात पुनरागमन झालं आहे. जाफरची ओडिशा टीमचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जाफरची दोन वर्षांसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ओडिशा क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी सुब्रत बहेडा यांनी दिली आहे. जाफर आता ओडिशाचा माजी कॅप्टन रश्मी रंजन परीदाची जागा घेईल. तो मुख्य टीमच्या प्रशिक्षणासोबतच राज्यातील सर्व वयोगटातील खेळाडूंच्या क्रिकेट विकास कार्यक्रमातही सहभागी होणार आहे. रणजी टीमचा कोच होण्याची जाफरची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तो उत्तराखंड टीमचा कोच होता. धार्मिक वादातून त्याने पाच महिन्यांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला होता. काय झाला होता वाद? वसीम जाफरने टीममध्ये धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाने केला होता. पण दुसरीकडे वसीम जाफरने हे आरोप फेटाळून लावले आहेत. उत्तराखंड टीमच्या सराव सत्रात मौलवींना आणल्याचा आरोपही जाफरने फेटाळून लावला आहे. 'बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मौलवी, मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले, पण त्यांना मी बोलावलं नव्हतं,' असं स्पष्टीकरण जाफरने दिलं. 'उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या आरोपांमुळे मला त्रास झाला आहे.' टीम निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे आणि निवड समिती आणि उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप करत वसीम जाफरने पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले होते. मात्र अद्याप याचा चौकशी अहवाल आलेला नाही. टीम इंडियाला कोरोना लाटेतील निष्काळजीपणा भोवला, खेळाडूंचं आरोग्य धोक्यात देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज जाफरनं टीम इंडियाकडून 31 टेस्ट आणि दोन वन-डे सामने खेळले आहेत. तो सध्या पंजाब किंग्ज या आयपीएल टीमचा बॅटींग कोच आहे. मुंबई आणि विदर्भ या दोन टीमकडून जाफर देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. जाफरने 260 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 50.67 च्या सरासरीनं 19410 रन केले आहेत. यामध्ये 57 शतक आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे. तर A गटाच्या लढतीमध्ये जाफरनं 118 सामन्यात 44.08 च्या सरासरीनं 4849 रन काढले आहेत.
First published:

Tags: Cricket news, Mumbai

पुढील बातम्या