मुंबईच्या बस कंडक्टर मुलाची 'बेस्ट' कामगिरी, टीम इंडियात निवड; सचिनने केलं होतं कौतुक

मुंबईच्या बस कंडक्टर मुलाची 'बेस्ट' कामगिरी, टीम इंडियात निवड; सचिनने केलं होतं कौतुक

श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या युवा आशियाई कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या युवा आशियाई कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यात कारगिल युध्दात भारताला विजय मिळून देणाऱ्या एका हिरोचा मुलगा ध्रुव जुरेलकडे कर्णधारपद असणार आहे. दरम्यान या स्पर्धेत मुंबईतील एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला संधी मिळाली आहे. या खेळाडूचे नाव आहे अर्थव अंकोळेकर.

अर्थव दहा वर्षांचा असताना 2019मध्ये बेस्टमध्ये कंडक्टर असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अर्थवची आई वैदही अंकोळेकर यांनी कंडक्टरची नोकरी स्विकारत अर्थवला वाढवले. अर्थव डावखुरा फिरकीपटू असून सध्या रिझवी कॉलेजमध्ये 12वीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान अर्थवची संघात निवड झाल्यानंतर त्याच्या आईला जवळजवळ 40 हजार संदेश आले होते.

आईनं हिम्मत न सोडता वाढवले

डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अर्थवची संघात निवड झाल्यानंतर खुप लोकांनी चांगले संदेश दिले असे सांगितले. यावेळी वैदही यांनी, “माझे पती विनोद बेस्टमध्ये कंडक्टर होते. घरात ते एकटे कमवणारे होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही एकटे पडलो. तेव्हा मी इतरांच्या मदतीनं क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मलाही बेस्टमध्ये नोकरी मिळाली.

वाचा-फ्लॉप राहुल चालतो मग रोहित का नाही? चाहत्यांचा विराटवर संताप

वडिलांच्या आठवणीत असतो अर्थव

वैदही या मरोल बस डेपोत काम करतात, त्या 186 आणि 340 बसमध्ये काम करतात. तर, अर्थव वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मदत करतो. मात्र, क्रिकेट खेळताना किंवा अभ्यास करताना वडिलांच्या आठवणीत असतो. भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अर्थवनं खुप मेहनत केली आहे. अर्थव यांनी, “जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाबा उश्याखाली क्रिकेटची बॅट ठेवायचे. जेव्हा मी चांगली कामगिरी करायचो, तेव्हा ते मला बक्षिस द्यायचे. या सगळ्याची मला खुप आठवण येते.

अर्थवनं सचिनला केले होते बाद

9 वर्षांपूर्वी एका सराव सामन्यादरम्यान अर्थवनं मास्टर ब्लास्टर सचिनला बाद केले होते. सचिनचं त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. सचिनला बाद केल्यानंतर त्यांनी स्वत:ची सही असलेली एक बॅटही बक्षिस म्हणून अर्थवला दिली होती.

वाचा-आफ्रिका दौऱ्यासाठी 6 दिवसआधीच झाली टीम इंडियाची निवड! 'हे' आहे कारण

कारगिल युध्द जिंकलेल्या हिरोचा मुलगा असणार संघाचा कर्णधार

कारगिल युध्दात भारतासाठी सीमेवर ज्यांनी शत्रुशी दोन हात केले. त्याच भारतीय लष्करातील जवानामुळं पाकिस्तानला गुडगे टेकावे लागले, आता त्याच जवानाचा मुलगा भारताचा झेंडा अटकेपार रोवण्यास सज्ज आहे. मात्र, हा मुलगा सीमेवर युध्द नाही तर क्रिकेटमध्ये भारतीय संघाला आशियाई चषकात विजय मिळून देण्यास सज्ज आहे. हा खेळाडू आहे, ध्रुव जुरेल. ध्रुव भारतीय अंडर-19 संघाकडून युवा आशियाई चषक खेळणार आहे. ध्रुवकडे भारतीय संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळं सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी ध्रुव सज्ज आहे. दरम्यान, ध्रुवचे वडिल 1999मध्ये झालेल्या कारगिर युध्दात लढले होते. आग्रा येथे स्थायिक असलेला ध्रुव त्याचा विकेटकिपींगसाठी ओळखला जातो. तसेच, कठिण प्रसंगात संयमी त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. गेल्या वर्षभरात ध्रुवनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं अंडर-19 युवा आशियाई चषकासाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

वाचा-वडिलांनी जिंकून दिले कारगिल युध्द, मुलगा धोनी स्टाईलनं क्रिकेट कप जिंकण्यास सज्ज

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या