सर्फराज धोका नाही देत! विराटने संघातून वगळलेल्या मुंबईकर खेळाडूचे सलग दुसरे द्विशतक

सर्फराज धोका नाही देत! विराटने संघातून वगळलेल्या मुंबईकर खेळाडूचे सलग दुसरे द्विशतक

सर्फराज खानने रणजी ट्रॉफीत या हंगामात दोन डावात आतापर्यंत 527 धावा केल्या आहेत. यात एका त्रिशतकासह द्विशतकाचा समावेश आहे. दोन्ही वेळा तो नाबाद राहिला आहे.

  • Share this:

धर्मशाला, 27 जानेवारी : भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या फॉर्ममध्ये नाही तसेच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दुसरीकडे त्याचा मित्र सर्फराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये वादळ निर्माण केलं आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. सर्फराज आणि ऋषभ पंत 2014 आणि 2016 मध्ये अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एकत्र खेळले आहेत. गेल्या डावात सर्फराजने त्रिशतक झळकावलं होतं त्यानंतर आता नाबाद द्विशतक केलं आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या कामगिरीनंतर त्याने आता हिमाचलविरुद्ध द्विशतक केलं.

हिमाचल विरुद्धच्या सामन्यात दिवसाचा खेळ संपेपर्यंत सर्फराज खानने 213 चेंडूत 226 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 32 चौकारांसह 4 षटकार लगावले. अंधुक प्रकाशामुळे 75 षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. तत्पूर्वी, मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. त्यांची सुरुवात खराब झाली होती. 16 धावांवर तीन तर 71 धावांत चार गडी बाद झाले होते. त्यानंतर सर्फराज खानने आदित्य तारेसोबत पाचव्या गड्यासाठी 153 धावांची भागिदारी केली.

आदित्य तारे बाद झाल्यानंतर 100 चेंडूत 62 धावा केल्या. तोपर्यंत संघाच्या 5 बाद 214 धावा झाल्या होत्या. यानंतर सर्फराज खानने शुभमसोबत डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने 5 बाज 372 धावा केल्या. सर्फराज आणि शुभमने सहाव्या गड्यासाठी नाबाद 148 धावांची भागिदारी केली.

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावणाऱ्या कोबीचं बास्केटबॉलला प्रेमपत्र, पाहा VIDEO

सर्फराज खानने रणजी ट्रॉफीत या हंगामात दोन डावात आतापर्यंत 527 धावा केल्या आहेत. यात एका त्रिशतकासह द्विशतकाचा समावेश आहे. दोन्ही वेळा तो नाबाद राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली टीम इंडिया असो किंवा आयपीएलमध्ये आरसीबी असो युवा खेळाडूंवर विश्वास ठेवतो. पण तो कोणत्याही बाबतीत फिटनेसमध्ये तडजोड करत नाही. यामुळेच त्याने विराट कोहलीने 2016 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा खेळाडू सर्फराज खानने 10 चेंडूत 35 धावा केल्यानंतरही संघातून बाहेर ठेवलं होतं. त्यावेळी त्याच्यावर पीके चित्रपटातील डॉयलॉग वापरून ट्रोल करण्यात आलं होतं. सर्फराजने धोका दे दिया असं म्हणत त्याच्यावर टीका झाली होती.

मांजरेकर आणि जडेजा यांच्यात पुन्हा जुंपली, केएल राहुल ठरला कारण

सर्फराज खानने चार वर्षांपूर्वी मुंबईची साथ सोडून उत्तर प्रदेशकडून खेळण्यास सुरुवात केली होती. उत्तर प्रदेशाकडून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पुन्हा सर्फराज मुंबईच्या संघात परतला. यंदाच्या सत्रात त्याला रणजीत मुंबईने संधी दिली. बुधवारी त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती.

...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का?, VIDEO VIRAL

First published: January 27, 2020, 7:37 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading