भारतीय संघासाठी एण्ट्री गेट ठरेल टी-20 मुंबई लीग – गावसकर

भारतीय संघासाठी एण्ट्री गेट ठरेल टी-20 मुंबई लीग – गावसकर

14 ते 26 मार्च दरम्यान ही टी-20 लीग खेळली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मे : एकीकडं आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असले तरी, सध्या मुंबईत चर्चा आहे ती मुंबई क्रिकेट लीगची. मुंबईतील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशच्या वतीने मागच्या वर्षीपासून मुंबई टी-20 लीगलला सुरवात झाली. दरम्यान या लीगच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मुंबई लीगमध्येच मुंबई खेळाडूंचा टक्का घसरला आहे, अशी खंत माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

14 ते 26 मार्च दरम्यान ही टी-20 लीग खेळली जाणार आहे. हे सामने वानखेडे स्टेडियमवर होणार असून, यात श्रेयस अय्यर,सुर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी यांच्यासारखे आयपीएल गाजवणारे खेळाडू सहभागी होतील. दरम्यान मुंबई खेळाडूंची घटणारी संख्या पाहता, गावसकर यांनी मुंबई लीगमध्ये जास्तीत जास्त मुंबईकर खेळाडूंनी संधी द्यावी जेणेकरुन मुंबईकर खेळाडू हे केवळ आयपीएलचं नाही तर भारतीय संघातही आपलं स्थान पटकावतील. यावेळी गावसकर यांनी बोलताना, ‘’आतापर्यंत भारतीय संघात 50हून अधिक खेळाडू पंजाबकडून खेळले आहेत. मात्र त्यामानाने मुंबईकर खेळाडूंची संख्या खुपच कमी आहे. ते खेळाडू चांगलेच आहे. पण जर मुंबईला क्रिकेटची पंढरी मानतो तर मुंबईकर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का कमी दिसतात’’, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर, ‘’मुंबई लीगचं कौतुक करताना, ही ट्वेंटी-20 देशातील अन्य राज्यांतील सर्वात यशस्वी लीग आहे. या लीगमधूनच शिवम दुबे, सुर्यकुमार यादव असे मातब्बर खेळाडू आयपीएलला दिले आहेत. भविष्यात आणखी खेळाडू यात सामिल होतील. पण आमचं लक्ष्य केवळ आयपीएल नाही तर, 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आहे. या लीगमधून भारतीय संघासाठी जास्तीत जास्त खेळाडू जायला हवेत’’, अशी इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली. यावेळी एमसीएचे दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते. तर, या टी-20 मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँम्बेसेडर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता.

दरम्यान या लीगमध्ये सचिनचा मुलगा अर्जुन याच्यावरही ही अष्टपैलू गटातून 5 लाखांची बोली लावण्यात आली होती. दरम्यान 1 लाख रुपये इतके बेस प्राइस निश्चित करण्यात आले होते. अर्जुनला आकाश टायगर्सनं विकत घेतले. अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली. मुंबई क्रिकेट असोसिएशनं 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. या लीगमुळं मुंबईमधील युवा खेळाडूंना एक नवीन संधी मिळाली आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता.

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 04:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading