VIDEO : खतरनाक यॉर्कर! स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर; तरी पंचांनी दिला NOT OUT

VIDEO : खतरनाक यॉर्कर! स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर; तरी पंचांनी दिला NOT OUT

पाहा क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात खतरनाक यॉर्कर.

  • Share this:

केप टाऊन, 05 डिसेंबर : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच विचित्र प्रकार घडत असतात. यात नो-बॉलवरून राडेबाजी होणे काही नवीन नाही. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांमध्येही असे प्रकार घडले आहेत. मात्र बोल्ड होऊनही फलंदाजाला नाबाद ठरवलेले प्रकार फार कमी घडले आहेत. मुळात याच पंचांची नाही तर चूक ही गोलंदाजांची आहे. हा सगळा प्रकार घडला तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या मजांसी सुपर लीगमध्ये (Mzansi Super League 2019)

जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज सध्या दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या मजांसी सुपर लीगमध्ये खेळत आहेत. यातील केप टाऊन ब्लिट्स आणि टीश्वाने स्पार्टन्स (Cape Town Blitz Vs Tshwane Spartans) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अजब प्रसंग घडला. पाकिस्तानचा जलद गोलंदाज वहाब रियाज (Wahab Riaz) या स्पर्धेत केप टाउन ब्लिट्स संघाकडून खेळत आहेत. या सामन्यात त्यानं सर्वात खतरनाक यॉर्कर चेंडू टाकला. या यॉर्करचा सामना करताना, चक्क फलंदाज रोएल्फ वन डर मर्व (Roelof van der Merwe) मैदानावर पडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-टी-20 मधील World Record; या संघाने 249 धावांनी मिळवला विजय!

वहाबचा यॉर्कर थेट स्टम्पवर गेला आणि विकेट जमिनीपासून लांब फेकल्या गेल्या. या यॉर्करनंतर फलंदाज आऊट झाला असे सगळ्यांना वाटले, मात्र मर्व आऊट झाला नाही. तिसऱ्या पंचांनी वहाबनं नो-बॉल टाकल्याचे सांगत फलंदाजाला नाबाद घोषित केले. वहाबनं टाकलेला हा यॉर्कर जगातला सर्वात खतरनाक यॉर्कर मानला जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोलंदाजाला ट्रोल करण्यात येत आहे.

वाचा-'कॅच सुटल्यानंतर पंत चेंडू पकडण्यास देखील घाबरतो'

 

View this post on Instagram

 

Best no ball ever

A post shared by cricket Videos (@cricket.latest.videos) on

वाचा-सिंगर धोनी तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर VIDEO VIRAL

दरम्यान या सामन्यात केप टाऊनने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीश्वाने स्पार्टन्स संघाला केवळ 142 धावा करता आल्या. या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेणाऱ्या डेल स्टेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Published by: Priyanka Gawde
First published: December 5, 2019, 12:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading