निवड समितीनं शोधला पंतला पर्याय, तीन खेळाडूंची नावे आघाडीवर!

निवड समितीनं शोधला पंतला पर्याय, तीन खेळाडूंची नावे आघाडीवर!

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या बेजबाबदार फलंदाजीमुळं अडचणी वाढल्या असल्याचं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या खराब फलंदाजीमुळं टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहालीत पंत चुकीच्या पद्धतीने खेळला आणि विकेट गमावून बसला. धोनीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या पंतला खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहण्यात अपयश येत आहे. तो सहज विकेट गमावतो. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं की, पंतने अडचणी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत आणखी एका यष्टीरक्षक फलंदाजाला तयार केलं जात आहे जो ही जबाबदारी सांभाळू शकेल.

एमएसके प्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ऋषभ पंतवर आमचं लक्ष आहे. त्याच्यावर पडणाऱा भार पाहता नक्कीच तिन्ही प्रकारात त्याची जागा घेतील अशा खेळाडूंना तयार केलं जात आहे. आमच्याकडं केएल भरत आहे ज्याने इंडिया ए कडून कसोटीत खेळताना चांगली कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशान किशन, संजू सॅमसन हे दोघे आहेत. हे पर्याय म्हणून असले तरीही पंतवर पूर्ण विश्वास असून यष्टीरक्षक म्हणून त्यालाच पसंती दिली जाईल.

ऋषभ पंत प्रतिभा आहे. सध्या तो बेजबाबदार फटके खेळत आहे. त्याला नव्या फलंदाजी प्रशिक्षकांनी सल्ला दिला आहे. तो समजून घेऊन त्यानं खेळावं असं एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवे फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनी म्हटलं की, पंतला शिस्त आणि बेजबाबदार फटके यातलं अतंर समजून घ्यायला हवं. या दोघांशिवाय पंतला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनीही इशारा दिला आहे.

वाचा : पंतच्या समोर धोनी काहीच नाही; ट्रोल करण्याआधी ही बातमी वाचा!

आतापर्यंत ऋषभ पंतने 19 टी20 सामने खेळले आहेत. त्यामुळं सामन्यातील परिस्थिती पाहून त्यानं फलंदाजी करावी. अनेकवेळा तो अपयशी ठरला आहे. याच कारणामुळे धोनी टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जर पंतने त्याच्या कामगिरीत सातत्य राखलं नाही तर पुन्हा नवीन खेळाडूचा वर्ल्ड कपसाठी विचार करणं आव्हानात्मक ठरेल. अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो.

वाचा : 'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

धोनी सध्या मैदानापासून दूर आहे. वर्ल्ड कपनंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. सध्या 38 वर्षाचा असलेला धोनी टी 20 वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतो. तसेच याआधीही निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही धोनीची संघाला गरज आहे असं म्हटलं होतं.

वाचा : IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!

SPECIAL REPORT: भाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 09:06 AM IST

ताज्या बातम्या