धोनीची निवृत्ती नक्की? निवड समितीच्या प्रमुखांनी दिला सूचक इशारा

धोनीची निवृत्ती नक्की? निवड समितीच्या प्रमुखांनी दिला सूचक इशारा

वर्ल्ड कपनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या टी20 संघात त्याची निवड झाली नाही.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द आता संपण्याच्या मार्गावर आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. विंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर धोनी रांची कसोटीत शेवटच्या दिवशी संघासोबत दिसला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीची निवड झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये धोनीचे नाव नसल्याने पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला आहे.

धोनीने स्वत:हून विंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर बांगलादेश दौऱ्याबाबत मात्र त्याच्याकडून माघार घेतल्याचं समोर आलेलं नाही. तरीही त्याची निवड न झाल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आलं. तेव्हा प्रसाद यांनी म्हटलं की, आता धोनीच्या पलिकडं विचार करायला हवा. यापुढे ऋषभ पंतला संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बांगालदेशविरुद्ध धोनी पुनरागमन करेल असं म्हटलं जात होतं पण असं झालं नाही. प्रसाद यांना विचारण्यात आलं की धोनीला संघातून बाहेर काढलं आहे का? यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की, वर्ल्ड कपनंतर स्पष्ट केलं होतं की आम्ही आता पुढचा विचार करत आहे. युवा खेळाडूंना संधी देत आहोत आणि ते स्वत:ला सिद्ध करू शकतील. सध्या पंत आणि संजू सॅमसन संघात आले आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही आमचं म्हणणं समजून घेत असाल.

प्रसाद म्हणाले की, युवा खेळाडूंना संधी देण्याच्या निवड समितीच्या मताशी धोनीदेखील सहमत आहे. आमची धोनीशी चर्चा झाली असून त्यानंही निवड समितीचा हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.

निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे धोनीचा असेल असं एमएसके प्रसाद यांनी म्हटलं. आता त्याने घरेलू क्रिकेटमध्ये खेळून पुनरागमन करायचं की निवृत्ती घ्यायची याचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा असेल.  आम्ही आधीच त्याची कारकिर्द लांबवली आहे असंही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

वाचा : भारताला मिळाला टी-20चा नवा कर्णधार! संघानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी

VIDEO : जेसीबी घेऊन उधळला गुलाल, सेनेच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Oct 25, 2019 07:24 AM IST

ताज्या बातम्या