'सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसता', निवड समितीच्या अध्यक्षांचे गावस्करांना सडेतोड उत्तर

'सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसता', निवड समितीच्या अध्यक्षांचे गावस्करांना सडेतोड उत्तर

भारताच्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर अनेकांनी निवड समितीवर टीका केली. त्यावर पहिल्यांदाच एमएसके प्रसाद यांनी उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघाच्या निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर विंडीज दौऱ्यासाठी करण्यात आलेल्या निवडीवरूनही टीका झाली. सध्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या क्रिकेटच्या अनुभवावरून टार्गेट करण्यात आलं. याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी निवड समितीचे प्रमुख कमकुवत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी विराटकडेच कर्णधारपद कायम ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. निवड समिती इतक्या कमी वेळात कशी निवड करते असंही गावस्कर यांनी म्हटलं होतं. निवड समितीत असलेल्या 5 सदस्यांना फक्त 13 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे.

निवड समितीत असलेल्या सदस्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना प्रसाद म्हणाले की, सर्व सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणीत 477 सामने खेळले आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही सर्वांना मिळून 200 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव आहे. हे आकडे पाहून आम्ही एक खेळाडू आणि निवडकर्ता म्हणून चांगलं कौशल्य ओळखू शकत नाही असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

निवड समितीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की आमच्या संघाने 13 कसोटी मालिकेपैकी 11 मध्ये विजय मिळवला आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत आयसीसीच्या क्रमवारीत कसोटी संघ नंबर एकवर आहे. जर तुम्ही सर्वाधिक सामने खेळलात त्यावर तुमची योग्यता ठरणार असेल तर इंग्लंडच्या निवड समितीचा अध्यक्ष असलेल्या एड स्मिथकडे फक्त एका कसोटीचा अनुभव आहे.

ऑस्ट्रेलियाचे ट्रेवोर होन्स यांच्याकडे 7 कसोटींचा अनुभव असून 128 कसोटी आणि 244 वनडे खेळणाऱे मार्क वॉ त्यांच्या हाताखाली काम करतात. जर त्या देशात पद आणि आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा नाही तर आपल्या देशात का नाही असा प्रश्न प्रसाद यांनी उपस्थित केला.

प्रसाद म्हणाले की, प्रत्येक कामकासाठी वेगळी गरज असते. आंतरराष्ट्रीय अनुभव लक्षात घ्यायचा झाला तर मग राज सिंह डूंगरपूर यांना कधीच निवड समितीचे अध्यक्ष झाले नसते. त्यांना एकाही आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याचा अनुभव नाही. तर सचिन तेंडुलकर 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नसता.

आम्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर करतो. त्यांचा प्रत्येक सल्ला योग्य पद्धतीनं घेतला जातो. त्यांच्याकडं त्यांचा दृष्टीकोन आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडून होणाऱ्या टीका दुर्दैवी आहेत. तरीही त्यांच्या टीकांनी खचून न जाता आम्ही मजबूत होतो असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

निवड समितीचे रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्याशी मतभेद असतील तर काय करता असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला होता. त्यावर प्रसाद म्हणाले की, भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार कोहली आणि भारत ए च्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी असलेल्या राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली जाते. निवड समितीची स्वत:ची एक भूमिका आणि जबाबदारी आहे. आम्ही एकत्र मिळून काम करतो. त्यात कोणताही दबाव नसतो. अनेकदा मतभेद होतात पण लोकांपर्यंत पोहचत नाही. शेवटी आम्ही तेच करतो जे संघाच्या आणि देशाच्या हिताचं असतं.

लोकांचा गैरसमज आहे की ज्या खेळाडूंनी जास्त क्रिकेट खेळलं आहे ते जास्त समजूतदार आहेत. त्यांच्याकडं अधिक क्षमता आहे पण हे खरं नाही. असं असतं तर निवड समितीत, प्रशिक्षक आणि इतर ठिकाणी फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेले लोक दिसले असते असंही एमएसके प्रसाद म्हणाले.

विचित्र गोलंदाजीने फलंदाजाची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

भारताला मोठा धक्का; पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी, BCCIनं घातली बंदी

VIDEO : जितेंद्र आव्हाडांचा शिवेंद्रराजेंच्या वारस हक्कावर प्रश्नचिन्ह, दिलं 'हे' थेट आव्हान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 31, 2019 09:02 AM IST

ताज्या बातम्या