मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: समोरच्याची बोलती बंद करणारी धोनीची 'अशीही' बॅटिंग... Video

MS Dhoni: समोरच्याची बोलती बंद करणारी धोनीची 'अशीही' बॅटिंग... Video

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni: धोनीचा हजरजबाबीपणा, मुलाखतकारालाच अचंबित करण्याचा त्याचा स्वभाव, विनोदी शैली यामुळेही धोनीचे अनेक चाहते आहेत. क्रिकेटव्यतिरिक्त त्याच्या सार्वजनिक जीवनातील किश्श्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. धोनी हा टीम इंडियाचं नेतृत्व करणारा सर्वांत यशस्वी कर्णधार. खेळाडू म्हणून त्याच्या वेगळ्या शैलीचं जसं कौतुक होतं, तसाच तो त्याच्या विनोदी प्रत्युत्तरांमुळेही चाहत्यांना आपलंसं करतो. सोशल मीडियावरही तो नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतलेली असली, तरी सध्या सुरू असणाऱ्या सामन्यांमध्ये धोनी कसा खेळला असता, त्यानं कोणते डावपेच वापरले असते अशा चर्चा ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर रंगतात. धोनीच्या सडेतोड व विनोदी पद्धतीनं उत्तर देण्याच्या काही जुने नमुनेदार व्हिडिओ सध्या ट्विटरवर फिरत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये मंदिरा बेदीच्या प्रश्नावर धोनीनं अफलातून उत्तर दिलं आहे.

आयुष्यात आतापर्यंत मिळालेली सर्वांत मौल्यवान भेट कोणती, असा प्रश्न मंदिरा धोनीला विचारते आहे. त्या वेळी धोनीनं दिलेलं उत्तर त्याच्या नर्मविनोदी शैलीची ओळख करून देणारं आहे. हे उत्तर देण्याआधी धोनी क्षणभर थांबतो. त्यादरम्यान मंदिरा त्याला ‘माझी मुलगी’ असं उत्तर देण्यासाठी हिंट देते; मात्र त्यावर धोनी नकारार्थी मान हलवतो. ‘ती भेट नाही, ते तर मेहनतीचं फळ आहे,’ असं उत्तर देतो. त्याच्या या उत्तराने हसू आलं नाही तरच नवल. या व्हिडिओला अनेत लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

ही क्लिप ‘मास्टरकार्ड्स प्राइसलेस मोमेंट्स’ या मालिकेतून घेण्यात आली आहे. मास्टरकार्ड्स या ब्रँडसाठी धोनीनं 2019मध्ये काम केलं आहे. ही पूर्ण मुलाखतही उपलब्ध आहे.

हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले 'हे' प्रमुख अडथळे

मुलाखतकाराला अवाक करण्याची त्याची ती एकमेव वेळ नाही. त्याच्या हजरजबाबीपणाची साक्ष देणारे आणखीही काही व्हिडिओ आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ 2016मधल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून भारतीय टीम बाहेर पडल्यावर पत्रकारांशी संवाद साधतानाचा आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजनं भारताला हरवलं होतं. निवृत्तीसोबतच इतर काही अवघड प्रश्नांचा सामना मॅचनंतरच्या पत्रकारांसोबतच्या संवादात करावा लागेल, असं धोनीला वाटलं होतं. त्या अंदाजानुसार, फेरीस नावाच्या एका परदेशी पत्रकारानं धोनीला या मालिकेनंतर खेळ सुरू ठेवणार का असं विचारलं. त्या वेळी धोनीनं सरळ त्याला शेजारी बसायला बोलावलं.

हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया निसटता पराभव, पण गब्बरचा हा 'शेर' ठरला दक्षिण आफ्रिकेवर भारी

'थोडी गंमत करू' असं म्हणून 'मी निवृत्त व्हावं असं वाटतं का,' असं त्यालाच विचारलं. त्या पत्रकारानं 'हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता,' असं धोनीला सांगितलं. त्यावर धोनीनं 'मी खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही असं वाटतं का' हा सवाल केला. पत्रकाराने नकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर 'मला धावताना पाहिलंय का' असंही धोनीने त्याला विचारलं. यावर 'खूप वेगाने' असं त्याचं उत्तर आल्यावर मग 'मी 2019 च्या विश्वचषकापर्यंत असेन असं वाटतंय का' असा थेट प्रश्न त्या पत्रकाराला केला. पत्रकारानं ‘हो निश्चित’ असं उत्तर दिल्यावर, धोनीने 'तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे,' असं सांगून पत्रकाराला अवाक केलं.

'हा प्रश्न विचारणारा भारतीय पत्रकार असता, तर मी त्याला विचारलं असतं, की तुम्हाला विकेटकीपर म्हणून खेळू शकेल एवढ्या वयाचा मुलगा किंवा भाऊ आहे का,' असंही धोनीने सांगितलं. त्या पत्रकाराने चुकीच्या वेळी चुकीचा प्रश्न विचारला असंही त्याने बिनधास्त सांगून टाकलं.

धोनीचा हजरजबाबीपणा, मुलाखतकारालाच अचंबित करण्याचा त्याचा स्वभाव, विनोदी शैली यामुळेही धोनीचे अनेक चाहते आहेत. क्रिकेटव्यतिरिक्त त्याच्या सार्वजनिक जीवनातील अशा किश्श्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

First published:

Tags: Cricket, Cricket news, MS Dhoni