Home /News /sport /

Video: वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी धोनीच्या मुलीची पहिली जाहिरात, वडिलांसोबत नवी इनिंग सुरु!

Video: वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी धोनीच्या मुलीची पहिली जाहिरात, वडिलांसोबत नवी इनिंग सुरु!

धोनीची पाच वर्षांची मुलगी झिवा (Ziva Dhoni) ही वडिलांप्रमाणेच लोकप्रिय आहे. तिचे इन्सटाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. झिवानं धोनीसोबतच तिची पहिली जाहिरात चित्रीत केली आहे.

  मुंबई, 5 जानेवारी: महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) हा क्रिकेट विश्वातील एक मोठा ब्रँड आहे. धोनी आता क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. तरीही त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही. आजही अनेक कंपन्यांना तो त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी हवा असतो. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) धोनीवर चित्रीत झालेल्या अनेक जाहिराती सर्वांनी पाहिल्या आहेत. आयपीएल स्पर्धेनंतर पुन्हा एकदा रोजच्या प्रसिद्धीपासून धोनी दूर गेला आहे. मात्र जाहिरात विश्व त्याला विसरलेलं नाही. धोनीबरोबरच त्याची पाच वर्षाची मुलगी झिवा (Ziva) ही देखील एका जाहिरातीमध्ये नुकतीच झळकली आहे. बाप से बेटी सवाई! धोनीची पाच वर्षांची मुलगी झिवा ही वडिलांप्रमाणेच लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. धोनी आणि साक्षीसोबतचे अनेक व्हिडीओ तिच्या या इन्स्टा अकाऊंटवर असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियामध्ये चांगलं बस्तान बसवल्यानंतर झिवानं आता जाहिरातीच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झिवाची धोनीबरोबरची पहिली जाहिरात आता तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. (हे वाचा-IPL 2020मध्ये सट्टा लावण्यासाठी नर्सने थेट भारतीय खेळाडूशी केला संपर्क) धोनी आणि झिवा हे कॅडबरी ओरिओ बिस्कीटच्या (Cadbury Oreo biscuits) जाहिरातीमध्ये एकत्र आहेत. ही जाहिरात नुकतीच सोशल मीडियावर झळकली असून त्यामधील बाप-लेकीची केमिस्ट्री चांगलीच लोकप्रिय होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Oreo (@oreo.india)

  नव्या इनिंगमध्येही व्यस्त ICC क्रिकेट वर्ल्ड 2019 नंतर धोनी वर्षभरापेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 या दिवशी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. सध्या धोनी हा चेन्नई सुपर किंग्स (CSK)  या आयपीएल टीमचा कॅप्टन आहे. धोनीनं रांचीतल्या फार्म हाऊसमध्ये शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्याच्या फार्म हाऊसमधील भाज्या या दुबईमध्ये विकल्या जातात. धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इनिंग संपलेली असली तरी तो रिटायरमेंटनंतरच्या नव्या इनिंगमध्येही व्यस्त आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, MS Dhoni

  पुढील बातम्या