चाहत्यांचं स्वप्न राहणार अधुरं, ‘या’ ऐतिहासिक क्षणाला मुकणार धोनी!

चाहत्यांचं स्वप्न राहणार अधुरं, ‘या’ ऐतिहासिक क्षणाला मुकणार धोनी!

चाहत्यांना मोठा धक्का, धोनीला पाहू शकणार नाही मैदानात.

  • Share this:

कोलकाता, 06 नोव्हेंबर : महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानापासून गेले तीन महिने लांब आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीनं भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. मात्र आता धोनी एका नव्या रुपात दिसण्याची शक्यता आहे. भारत-बांगलादेश यांच्यात कोलकातामध्ये होणाऱ्या पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्यात धोनी कॉमेंट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या.

मात्र पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या डे-नाइट सामन्यात धोनी कॉमेंट्री करू शकणार नाही आहे. 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना होती. आता मात्र चाहत्यांचे हे स्वप्न अधुरे राहणार असे चित्र दिसत आहे.

कॉमेंट्री केल्यास धोनीच्या अडचणी वाढणार

धोनीनं कोलकातामध्ये कसोटी सामन्यात कॉमेंट्री केल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार धोनीनं समालोचन केल्यास परस्पर हितसंबंध जोपासल्याप्रकरणी तो अकडू शकतो. त्यामुळं धोनी समालोचन करणार नाही. भारत-बांगलादेश सामन्याच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सला देण्यात आले आहेत. त्यामुळं स्टार-स्पोर्ट्सनं बीसीसीआयला पत्र लिहीत धोनीला या ऐतिहासिक सामन्यासाठी समालोचन करण्यासाठी संधी देण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयसोबत धोनीचा करार असल्यामुळं धोनी असे करू शकणार नाही.

असा असेल डे-नाईट सामना

नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे.

डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 08:15 AM IST

ताज्या बातम्या