मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...तर धोनी टी-20 वर्ल्ड कपही खेळला असता!

...तर धोनी टी-20 वर्ल्ड कपही खेळला असता!

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ने मागच्या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्ती घेण्याआधी धोनी 2020 सालचा टी-20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती

मुंबई, 22 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ने मागच्या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्ती घेण्याआधी धोनी 2020 सालचा टी-20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा हा वर्ल्ड कप रद्द करण्यात आला. यानंतर धोनीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं घोषित केलं.

निवृत्ती घेण्याआधी धोनी 2019 वर्ल्ड कपमध्ये शेवटची मॅच खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य दिसला नाही. न्यूझीलंडविरुद्धची ही मॅच हरल्यानंतर भारताचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं. कोरोनाआधी जवळपास 8 महिने धोनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नव्हता. यानंतर कोरोनामुळे जग लॉकडाऊनमध्ये गेलं, ज्यामुळे अनेक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या. पण जर कोरोना व्हायरस नसता तर धोनी 2020 सालचा टी-20 वर्ल्ड कप खेळला असता, असा दावा माजी निवड समिती सदस्य सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांनी केला आहे.

'धोनी भारतीय ड्रेसिंग रूममधला सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक होता. त्याचं दुखापतींचं रेकॉर्डही चांगलं होतं. आपल्या करियरमध्ये तो खूप कमी वेळा दुखापतग्रस्त झाला. टी-20 वर्ल्ड कपसाठीही धोनी चर्चेत होता. आपल्या देशासाठी धोनीची ती शेवटची सगळ्यात मोठी स्पर्धा असती,' अशी प्रतिक्रिया सरनदीप सिंग यांनी दिली.

'कोरोना नसता तर तो नक्कीच टी-20 वर्ल्ड कप खेळला असता. आम्हालाही तसंच वाटत होतं. तो फिट होता. त्याच्या न खेळण्याचं कोणतंही कारण नव्हतं. धोनीने सरावातूनही ब्रेक घेतला नव्हता. निवड समितीलाही तो वर्ल्ड कप खेळण्यासाठी लायक आहे, असं वाटत होतं. ही स्पर्धा खेळण्याचा त्याचा हक्कही होता,' असं सरनदीप सिंग स्पोर्ट्स कीडाशी बोलताना म्हणाले.

First published: