दोन महिन्यांनंतर घरी परतला धोनी, 'या' नव्या पाहुण्यासोबत घालवला वेळ!

लष्करातून ट्रेनिंग घेतल्यानंतर पहिल्यांदाच रांचीमध्ये आला धोनी.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 02:06 PM IST

दोन महिन्यांनंतर घरी परतला धोनी, 'या' नव्या पाहुण्यासोबत घालवला वेळ!

रांची, 21 सप्टेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तब्बल दोन महिन्यांनी आपल्या घरी म्हणजे रांची पोहचला. इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपनंतर धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेतली. त्यामुळं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर धोनीला संघात स्थान मिळाले नाही. या कालावधीत धोनीनं लष्करात भारतीय सैन्याचे ट्रेनिंग घेतले. धोनी जवळ जवळ एक महिना लष्करात ट्रेनिंग घेतली.

लेफ्टनंट कर्नल मानद असलेल्या धोनीनं जम्मू-काश्मीरमधअये आपले ट्रेनिंग पूर्ण करत 15 दिवस कामही केले. त्यानंतर धोनीनं आपले अपूर्ण काम पूर्ण केले. त्यानंतर धोनी अमेरिकेला रवाना झाला होता. त्यामुळं तब्बल दोन महिने क्रिकेटपासून आणि घरापासून लांब असलेला धोनी अखेर दोन महिन्यांनंतर रांचीमध्ये पोहचला. दरम्यान यावेळी रांचीमध्ये एक खास पाहुणा धोनीची वाट बघत होता. हा पाहुणा म्हणजे धोनीनं घेतलेली Jeep Grand Cherokee Trackhawk ही गाडी. या गाडीची किंमत आहे 1.12 कोटी. ही गाडी 6.2L HEMI V8 इंजिन क्षमतेची आहे.

धोनी लष्करात ट्रेनिंग घेत असताना साक्षीनं या गाडीचा फोटो शेअर करत, “रेडबीस्ट तुझं स्वागत आहे! धोनी अखेर तुझं खेळणं आलं आहे, त्यामुळं आम्ही तुला खूप मिस करत आहोत. तू लवकर ये ही गाडी आपल्या नागरिकत्वाची वाट पाहत आहे. कारण भारतातली ही पहिली गाडी आहे”, असे लिहिले होते. दरम्यान धोनीनं पत्नी साक्षी आणि काही जवळच्या मित्रांसोबत या नव्या गाडीचा आनंद घेतला.

वाचा-क्रिकेटच्या इतिहासात असा रनआऊट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

Loading...

वाचा-आता तरी पंत सुधारणार का? दिग्गज खेळाडूकडून मिळाले गुरूमंत्र

धोनीचे गाडी प्रेम

धोनीचे गाडी प्रेम सर्वांना माहित आहे. धोनीकडे फरारी 599 जीटीओ, हॅमर एच-2, जीएमसी सिएरा अशा गाड्या आहेत. तर, भारतात कोणाकडे नसतील अशा बाईकचा संग्रह आहे. धोनीकडे कावास्की निन्जा एच-2, कोनफेडेरेट हेलकॅट, बीएसए, सुजूकी हायाबूसा आणि एक नॉर्टन विंटेज अशा बाईक आहेत.

जीप ग्रेंड शेरोकी ट्रेकहॉक गाडीचे वैशिष्ट्य

धोनीची नवीन गाडी 5 सीटर असून 6100 सीसी इंजिन आहे. साथ ही 8 गिअर आणि इंजिनची क्षमता 707 एचपी आहे. या गाडीत पॉवर स्टेअरिंग, अण्टी लॉक ब्रेकिंग सिस्‍टम, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो फ्रंट. ही गाडी भारतात अजूनही आलेली नाही. धोनीनं ब्रिटेनवरून ही गाडी आयात केली आहे.

वाचा-कॅप्टन कुल धोनीच्या घरी कित्येक दिवस लाईटच नाही, रागात साक्षी म्हणाली...

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...