• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ‘जेव्हा धोनी क्रिकेट खेळणं सोडेल, तेव्हा…’ रिकी पाँटिंगची मोठी प्रतिक्रिया

‘जेव्हा धोनी क्रिकेट खेळणं सोडेल, तेव्हा…’ रिकी पाँटिंगची मोठी प्रतिक्रिया

‘जेव्हा धोनी क्रिकेट खेळणं सोडेल, तेव्हा…’ रिकी पाँटिंगची मोठी प्रतिक्रिया

‘जेव्हा धोनी क्रिकेट खेळणं सोडेल, तेव्हा…’ रिकी पाँटिंगची मोठी प्रतिक्रिया

अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणे, हे फिनिशरचे (finisher ms dhoni)काम असते. आणि हीच भूमिका धोनीने (MS Dhoni) चोखपणे बजावली. धोनीच्या या खेळीचे कौतुक क्रिकेट जगतात होत असतानाच दिल्लीचे संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही त्याच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

 • Share this:
  दुबई, 11 ऑक्टोबर: क्रिकेट जगतात सर्वत्र सध्या फिनशीर धोनीची(MS Dhoni) चर्चा सुरु आहे. काल झालेल्या दिल्लीसोबतच्या (CSKvsDC)सामन्यात महेंद्र सिंह धोनी जुन्या फार्मात(finisher ms dhoni) दिसला. अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणे, हे फिनिशरचे काम असते. आणि हीच भूमिका धोनीने चोखपणे बजावली. धोनीच्या या खेळीचे कौतुक क्रिकेट जगतात होत असतानाच दिल्लीचे संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही त्याच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना पाँटिंग म्हणाले की, “धोनी क्रिडाविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. सामना सुरू असताना आम्ही डगआऊटमध्ये बसून विचार करत होतो की, पुढील फलंदाज रविंद्र जडेजा किंवा धोनी असेल. त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांना मी म्हटले होते की, आता धोनी फलंदाजीला येईल आणि सामन्याचा विजयी शेवट करण्याचा प्रयत्न करेल. हे वाचा- 'आज तुमचे हे चांगले खेळले'; ऋतुराजच्या खेळीमुळे सायली संजीववर चाहते भलतेच खूश तसेच, जेव्हा धोनी क्रिकेट खेळणे बंद करेल किंवा पूर्णपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, तेव्हा निश्चितपणे त्याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून विस्मरणात ठेवले जाईल. असे मत यावेळी पाँटिंग यांनी व्यक्त केले. यासोबतच, आम्ही शेवटच्या २ षटकात धोनीविरुद्ध जशी गोलंदाजी करायला हवी होती, तसे करण्यात आम्हाला यश आले नाही. सर्वांनाच माहिती आहे की, धोनीपुढे एकही चूक झाली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. यापूर्वी बऱ्याचदा याचा प्रत्यय आला आहे. आमच्याकडूनही तीच चूक झाली आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. रविवार रोजी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुबई येथे झालेल्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यातही धोनीने फिनिशरची भूमिका चोखपणे निभावली. त्याच्या १८ धावांच्या छोटेखानी पण आक्रमक खेळीमुळे चेन्नई संघाने १९.४ षटकातच हा सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: