IPL 2021 आधी देव दर्शनाला पोहोचला धोनी

IPL 2021 आधी देव दर्शनाला पोहोचला धोनी

आयपीएलचा (IPL 2021) 14 वा मोसम सुरू व्हायला आता काही आठवड्यांचा काळच बाकी आहे. त्याआधी चेन्नईचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) देव दर्शनाला पोहोचला.

  • Share this:

मुंबई, 1 मार्च : आयपीएलचा (IPL 2021) 14 वा मोसम सुरू व्हायला आता काही आठवड्यांचा काळच बाकी आहे. त्याआधी चेन्नईचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) देव दर्शनाला पोहोचला. आयपीएल 2020 साली चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. आता या आयपीएल आधी तो देवडी माता मंदिरात गेला. धोनीची या मंदिरावर आस्था आहे. प्रत्येक मोठ्या सीरिज आणि स्पर्धेआधी धोनी या देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो.

धोनीसोबत त्याचा लहानपणीचा मित्र सिमत लोहानीदेखील होता. धोनी येणार म्हणून मंदिराच्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार मंदिराच्या पुजाऱ्याला धोनी येणार याची आधीच कल्पना होती. तो यायच्या एक तास आधीच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आयपीएल 2021 स्पर्धा जवळ आली असली तरी धोनी मागच्या मोसमानंतर मैदानात उतरलेला ना्ही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही धोनी खेळला नाही. आता चेन्नई सुपरकिंग्सच्या कॅम्पमध्ये धोनी सराव करेल. धोनीने आयपीएलच्या मागच्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली होती. 14 मॅचमध्ये त्याला फक्त 200 रन करता आल्या होत्या. तसंच चेन्नईच्या टीमलाही आयपीएल इतिहासात प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली.

आयपीएलच्या या मोसमात चेन्नईने काही महत्त्वाच्या खेळाडूंना टीममध्ये घेतलं. मोईन अली, कृष्णप्पा गौतम आणि चेतेश्वर पुजारा, रॉबिन उथप्पा या खेळाडूंवर चेन्नईने बोली लावली.

Published by: Shreyas
First published: March 1, 2021, 10:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या