धोनीनं कॅप्टन झाल्यानंतर लगेच निवड समितीच्या सदस्याला दिलं होतं मोठं आश्वासन!

टीम इंडियाचाच (Team India) नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक यशस्वी कॅप्टन अशी महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ओळख आहे.

टीम इंडियाचाच (Team India) नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक यशस्वी कॅप्टन अशी महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ओळख आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 डिसेंबर :  टीम इंडियाचाच (Team India) नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक यशस्वी कॅप्टन अशी महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ओळख आहे. टी 20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कॅप्टन आहे. धोनीनं एकूण 332 मॅचमध्ये टीमचं नेतृत्वं केलं. त्याच्या नेतृत्वाखाली या तीन विजेतेपदासह अनेक संस्मरणीय विजय टीम इंडियाला मिळाले. 2007 मध्ये सुरु झाला प्रवास महेंद्रसिंह धोनीचा कॅप्टन म्हणून प्रवास 2007 साली दक्षिण आफ्रिकेत (South Africa) झालेल्या टी 20 वर्ल्ड कपपासून सुरु झाला. टी 20 या तेंव्हा नवीन असलेल्या क्रिकेटच्या पहिल्या वर्ल्ड कपमधून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांनी माघार घेतली होती होती. त्यामुळे धोनीकडं नव्या टीमचं नेतृत्व सोपवण्यात आले. त्याचवर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. या धक्कादायक पराभवानंतर टीमवर आलेली मरगळ झटकण्याचं काम धोनीच्या कॅप्टनसीनं केलं. त्याने त्या वर्ल्ड कपमध्ये अनेक नव्या कल्पना राबवल्या. (हे वाचा-जय शहांनी काढली गांगुलीच्या संघाची 'विकेट', क्रिकेटच्या 'दादा'चा पराभव) निवड समितीचे माजी सदस्य संजय जगदाळे (Sanjay Jagdale) यांनी ‘स्पोर्ट्सकीडा’ या इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीची एक खास आठवण सांगितली आहे. धोनीनं दिलं होतं मोठं आश्वासन! महेंद्रसिंह धोनीची पहिल्यांदा कॅप्टनपदी निवड करणाऱ्या समितीचे जगदाळे सदस्य होते. ‘दिलीप वेंगसरकर हे तेंव्हा निवड समितीचे अध्यक्ष होते. सचिन, सौरव आणि राहुल यांनी माघार घेतली होती. आम्हाला एक तरुण टीम निवडायची होती. मी तेंव्हा लंडनमध्ये होतो. धोनीला कॅप्टन करावं असं मत मी व्यक्त केलं होतं,’  अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. (हे वाचा-'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये होतो भेदभाव,' गावसकरांचा आरोप) ‘धोनीला सुरुवातीपासून स्वत:वर विश्वास होता. तो अतिशय शांत होता. सर, आम्ही हा वर्ल्ड कप जिंकून येऊ, असं आश्वासन त्याने मला दिलं होतं. धोनीचा हा आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो,’’ असे जगदाळे यांनी सांगितले. धोनीची टीम 2007 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकेल याची कुणालाही अपेक्षा नव्हती. त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं प्रत्येक मॅचमध्ये पहिल्यापेक्षा सरस खेळ करत विजेतेपद पटाकवले. दक्षिण आफ्रिकेतून वर्ल्ड कपसह परतलेल्या धोनीनं कॅप्टन झाल्यानंतर निवड समिती सदस्य जगदाळेंना दिलेलं एक मोठं आश्वासन पूर्ण केले.
    Published by:News18 Desk
    First published: