काश्मीरमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे रोखण्यासाठी धोनी करणार महत्त्वाचं काम!

30 जुलैला धोनीनं व्हिक्टर फोर्समध्ये आपले काम सांभाळले. दरम्यान 15 ऑगस्टला धोनी सैन्यासोबतच बटालियनमध्ये हजर असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 02:42 PM IST

काश्मीरमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे रोखण्यासाठी धोनी करणार महत्त्वाचं काम!

जम्मू, 09 ऑगस्ट : केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम 370 रद्द करण्यात आले. यामुळे आता लेह आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळं सध्या या राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्ताननं या सगळ्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळं धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे सुरू झाले आहे. दरम्यान ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कराकडून मोठं पाऊल उचलण्यात येणार आहे.

सध्या लष्कारात ट्रेनिंग घेत असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काश्मीरमध्ये स्थायिक आहे. त्यामुळं लष्कराच्या वतीनं धोनी लेहमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ध्वजारोहण करणार आहे. धोनीनं लष्करात काम करण्यासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. 30 जुलैला धोनीनं व्हिक्टर फोर्समध्ये आपले काम सांभाळले. दरम्यान 15 ऑगस्टला धोनी सैन्यासोबतच बटालियनमध्ये हजर असणार आहे.

वाचा-INDvsWI 1st ODI पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

खतरनाक Victor Forceमध्ये जॉईन झाला धोनी

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, व्हिक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात व्हिक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते.

Loading...

वाचा-विंडीज दौऱ्यातून डावललं, विक्रमी द्विशतक करून गंभीरला टाकलं मागे

निवृत्तीनंतर धोनी जाणार लष्करात?

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

वाचा-INDvsWI 1st ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी!

ट्रोल झालेल्या सेल्फी VIDEOवर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...