'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

विंडीजनंतर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही धोनी मैदानात उतरला नसल्यानं त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी त्याच्या निवृत्तीची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर मैदानावर दिसलेला नाही. विंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो उपलब्ध नाही. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय धोनीचा आहे असं म्हटलं आहे. मात्र, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी धोनीची वेळ आता संपली आहे असं म्हटलं आहे. त्याच्या निवृत्तीची वेळ आली असून पुढचा विचार करणं गरजेचं आहे असं गावस्कर यांनी म्हटलं.

सुनिल गावस्कर यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटलं की, मी आदरपूर्वक सांगतो की धोनीचा वेळ संपला आहे. भारताने आता पुढचा विचार करायला हवा. संघातून बाहेर काढण्यापूर्वी त्याला शेवटचा सामना खेळण्याची संधी द्यायला हवी.

वर्ल़्ड कपमधील पराभवानंतर धोनी देशात परतल्यावर निवृत्ती घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यानंतर धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत लष्करी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो शूटिंगमध्ये व्यग्र आहे. विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याचं नाव संघात नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

पंतच्या समोर धोनी काहीच नाही; ट्रोल करण्याआधी ही बातमी वाचा!

धोनीने 2014-15 मध्ये अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वन डे आणि टी20 क्रिकेट धोनी खेळतो आहे. माहीला नेहमीच धक्कातंत्र आवडतं. कोणी कल्पना केली नसेल अशा वेळी अचानक मोठा निर्णय जाहीर करण्याची धोनीची सवय आहे. 2014-15 मध्ये धोनीने असंच अचानक ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू असताना मध्येच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 2017 मध्ये धोनीने लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये कर्णधारपदही असचं अचानक सोडलं होतं.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार? इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Sep 20, 2019 08:12 AM IST

ताज्या बातम्या