Home /News /sport /

धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सहकारी खेळाडू लष्करात, शेअर केला PHOTO

धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सहकारी खेळाडू लष्करात, शेअर केला PHOTO

वर्ल्ड कपनंतर धोनीने लष्करी प्रशिक्षणही घेतलं होतं. आता त्याच्याच पावलावर पाऊल टाकत लंकेच्या एका खेळाडूने आर्मी जॉइन केली आहे.

    कोलंबो, 01 जानेवारी : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी देशाच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. वर्ल्ड कपनंतर धोनीने लष्करी प्रशिक्षणही घेतलं होतं. आता त्याच्याच पावलावर पाऊल टाकत लंकेच्या एका खेळाडूने आर्मी जॉइन केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलध्ये खेळलेल्या लंकेचा थिसारा परेरा मेजर म्हणून श्रीलंकेच्या लष्करात रुजू झाला आहे. थिसारा परेराने याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. थिसारा परेराने म्हटलं की, लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल शावेंद्र सिल्वा यांनी लष्करात रुजू होण्यासाठी आणि याच संघाकडून खेळण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांचे हे निमंत्रण मी स्वीकारले असून यामुळे त्यांना आनंद झाला आहे. लंकेकडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या आणि मध्यमगती गोलंदाज असेलेल्या थिसारा परेराने म्हटलं की, हा क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. यासाठी कमांडर सिल्वा यांचे आभार. क्रिकेटमध्ये लष्कराला सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करेन. थिसारा परेरा लष्कराच्या संघातून माजी खेळाडू आणि कर्णधार दिनेश चंडिमल याच्यासोबत खेळताना दिसेल. परेराने लंकेकडून 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 70 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत 203, एकदिवसीय मध्ये 2210 आणि टी20 मध्ये 1169 धावा केल्या आहेत. याशिवाय जगभरातील अनेक लीगमध्येही तो खेळला आहे. आयपीएलमध्ये परेरा चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, मुंबई इंडियन्स कडून मैदानात उतरला होता. वाचा : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! एक-दोन नाही तर 2020मध्ये होणार तब्बल तीन वर्ल्ड
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: MS Dhoni

    पुढील बातम्या