जवानापेक्षा कमी नाही धोनीचा जोश! गंभीर दुखापतीतही सीमेवर करतोय देशाचे संरक्षण

जवानापेक्षा कमी नाही धोनीचा जोश! गंभीर दुखापतीतही सीमेवर करतोय देशाचे संरक्षण

वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या अंगठ्यातून रक्तस्राव होत असतानाही त्यानं सामना खेळला होता. आता पुन्हा त्याच्या बोटाला जखम झाली आहे.

  • Share this:

जम्मू, 13 ऑगस्ट : भारतीय संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा वर्ल्ड कप 2019 दरम्यान इंग्लंड विरोधात झालेल्या सामन्यात एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात धोनीच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याच्या अंगठ्यातून रक्तस्राव होत होता. मात्र, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कपमध्ये धोनीला फक्त अंगठ्याला दुखापत झालेली नव्हती, तर बोटालाही दुखापत झाली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला वर्ल्ड कपमध्य गंभीर दुखापत झाली होती.

इन डॉट. कॉमला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीचे एका बोटालाही दुखापत झाली होती. असं असूनही धोनी मैदानावर खेळत राहिला. ही दुखापत एवढी गंभीर होती की, धोनीच्या बोटाला हेअरलाईन फ्रेक्‍चर झाला आहे. त्यामुळं त्याच्या हाताची हालचाल करनं कठिण झालं होतं”.

धोनीनं दुखापतीपासून सर्वांना ठेवलं गाफिल

एवढ्या गंभीर दुखापतीनंतरही धोनीनं आराम केला नाही. तर, टीम इंडियासाठी तो क्रिकेट खेळत राहिला. धोनीनं या जखमेबाबत कोणालाही सांगितले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धोनीला या जखमेबाबत कोणाला सांगायचे नव्हते. ही गोष्ट सार्वजनिक होऊ नये म्हणून ही जखम त्यांने स्कॅनही केली नाही. दरम्यान आता, या सगळ्या मागचे कारण धोनीचे टेरिटोरियल आर्मीमध्ये ट्रेनिंग होते, असे समोर आले आहे. धोनीला ट्रेनिंगपासून लांब राहायचे नव्हते त्यामुळं त्यानं ही गोष्ट दाबून ठेवली', असे सांगितले.

वाचा-ओव्हर असेल 10 चेंडूंची, कोणी होणार नाही LBW; क्रिकेटमध्ये होत आहेत मजेदार बदल!

ट्रेनिंगसाठी धोनीनं लपवली ती गोष्ट

धोनीनं सैन्यात जाण्यासाठी ही गोष्ट लपवली असली तर, सैन्यालाही याबाबत माहिती दिली नाही. धोनीकडे टेरिटोरिय आर्मीचे लेफ्टनंन कर्नलचे मानद असल्यामुळं तो सध्या काश्मीरमध्ये व्हिक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग घेत आहे. दरम्यान 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये ध्वजवंदन करणार असल्याच्याही बातम्या आहेत.

वाचा-ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, ICCनं सांगितली 'ही' डेडलाईन!

खतरनाक Victor Forceमध्ये जॉईन झाला धोनी

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, व्हिक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात व्हिक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते.

निवृत्तीनंतर धोनी जाणार लष्करात?

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

वाचा-सचिन म्हणाला, विराटनं माझा 100 शतकांचा मोडला तर...

VIDEO : जगण्यासाठी काही राहिलं नाही, कोसळलेलं घरं पाहून आजींना अश्रू अनावर

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading