IPL 2019 : वर्ल्ड कपच्या अगोदर धोनीने वाढवलं टेन्शन

चेन्नई संघाच्या सीईओंनी धोनी कधी खेळणार माहिती नाही असं म्हटलं आहे.

  • Share this:

चेन्नई सुपर किंग्जचा रविवारी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूशी सामना होणार आहे. मागच्या सामन्यातील पराभव विसरून प्लेऑफमध्ये सर्वात आधी स्थान मिळवण्याचं चेन्नईचं धेय असेल. चेन्नईला हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. हा त्यांचा यंदाच्या आयपीएलमधील दुसरा पराभव होता.

सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. रविवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या खेळण्याबद्दल आताच सांगता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

धोनी पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत काही माहिती नाही. आम्हाला आताच काही सांगता येणार नाही. तोच याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतो असं काशी विश्वनाथ यांनी म्हटलं आहे.

चेन्नईने या हंगामात आतापर्यंत 9 सामन्यापैकी 7 मध्ये विजय मिळवला आहे. आता एक विजय मिळवल्यानंतर त्यांना प्ले ऑफमध्ये जागा निश्चित होईल. विशेष म्हणजे चेन्नईने प्रत्येकवेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

धोनीच्या तंदुरुस्त नसल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर धोनीची दुखापत डोकेदुखी वाढवणारी आहे. धोनीची भूमिका वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

धोनी सध्या भारतीय संघातली सर्वात अनुभवी असा खेळाडू आहे. तो कर्णधार नसला तरी यष्टीरक्षक आणि विराटला नेतृत्व करताना होणारी मदत महत्त्वाची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 08:45 AM IST

ताज्या बातम्या