धोनीच्या राजकारणातील प्रवेशावर तुफान चर्चा, 'या' आमदारासोबत PHOTO VIRAL

धोनीच्या राजकारणातील प्रवेशावर तुफान चर्चा, 'या' आमदारासोबत PHOTO VIRAL

क्रिकेटपासून दोन महिने लांब असलेला धोनी आता करणार राजकारणात प्रवेश?

  • Share this:

रांची, 29 सप्टेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटपासून विश्रांती घेतली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीनं अंतिम आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या तर सिनेमात प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता 38 वर्षीय धोनी राजकारणात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा केल्या जात आहे.

धोनीला वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळं धोनी आता टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विश्रांतीनंतर धोनी काय करणार याची उत्सुकताही धोनीच्या चाहत्यांना लागली आहे. दरम्यान सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी क्रिकेट नाही तर बिलियर्ड्स खेळताना दिसत आहे.

दोन महिने क्रिकेट आणि घरापासून लांब असणारा धोनी काही दिवसांपूर्वी रांचीत पोहचला. रांचीमध्ये आपल्या घरी पोहचल्यानंतर धोनी आपल्या आवडत्या गाड्या आणि बाईक चालवताना दिसला. याच सगळ्यात धोनीचा स्थानिक आमदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. धोनीनं काही दिवसांपूर्वी झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर क्रिकेट नाही तर बिलियर्ड्स खेळताना दिसला. धोनी आमदार कुणाल सारंगीसोबत वेळ घालवत होता. यावेळी झारखंड क्रिकेट असोसिएशनचे बासु दा हे सुध्दा यावेळी उपस्थित होते. बासु दा धोनी, वरूण अरॉन आणि अन्य खेळाडूंसबोत राष्ट्रीय संघात खेळत होते. त्यामुळं कुणाल सारंगी आणि बासु दा यांच्यासोबत धोनीनं बिलियडर्स खेळण्याचा आनंद घेतला. आमदार कुणाल सारंगीनं यासंबंधी फोटो ट्वीट केले होते.

वाचा-श्रीसंतचा मोठा खुलासा, ‘पाच वेळा केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न कारण...’

कुणाल सारंगीनं शेअर केलेल्या फोटोवर, “खराब वातावरणामुळं काही कार्यक्रम आम्हाला रद्द करण्यात आले. त्यामुळं आम्ही आमच्या आवडत्या जागी बिलियर्ड्स खेळलो. मी माझ्या हिरोसोबत या फोटोमध्ये आहे”, असे ट्वीट केले आहे. त्यामुळं आमदारासोबत धोनीच्या वाढत्या जवळीकीमुळं धोनी राजकारणात एण्ट्री करेल अशा चर्चा रंगल्या आहेत.

वाचा-भाजप खासदार गौतम गंभीर अडचणीत, फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल

आता थेट पुढच्या वर्षी धोनी करणार पुनरागमन?

धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ धोनी दोन दिवसांत सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्यामुळं धोनी आता थेट पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यावेळी पुनरागमन करू शकतो. तसेही झाले नाही तर चाहत्यांना झिम्बाम्वे आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये खेळणार का धोनी?

धोनीनं अखेरचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. त्यानंतर धोनीनं एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार केल्यास धोनीची जागा ऋषभ पंत घेऊ शकतो. पण पंतची खेळी पाहता, टीम इंडियाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासेल.

वाचा-शास्त्रींची निवड कऱणारी समिती अडचणीत, पुन्हा होणार प्रशिक्षकाची निवड?

आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार धोनी

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले.

वाचा-सराव सामन्यात रोहित शर्मा झाला ‘झिरो’, तर दुसरीकडे राहुल ठरला ‘हिरो’!

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading