मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बॅटिंगचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची धोनीने केली बोलती बंद, म्हणाला...

बॅटिंगचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची धोनीने केली बोलती बंद, म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) जगभरात चाहते आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 31 मे: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) जगभरात चाहते आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे. टीम इंडियासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात धोनी लोकप्रिय झाला. काही क्रिकेटप्रेमी तर धोनीला देवच मानतात. चांगली फॅन फॉलोइंग असली तरी धोनीला अनेकवेळा ट्रोलर्स आणि टीकाकारांचा सामना करावा लागला. मैदानामध्ये नेहमी शांत असणाऱ्या धोनीचं व्यक्तीमत्व मनमौजीही आहे. स्टम्पच्या मागून धोनीने चतुराईने दिलेले सल्ले अनेकवेळा चाहत्यांचं मनोरंजन करतात. धोनी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सध्या धोनीसोशल मीडियापासून लांबच आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तो प्रचंड ऍक्टिव्ह असायचा, एवढच नाही तर तो ट्रोलर्सने केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर द्यायचा. असंच धोनीचं एक जुनं ट्वीट व्हायरल झालं आहे. 2012 सालच्या या ट्वीटमध्ये धोनीने ट्रोलरची बोलतीच बंद केली. जुलै 2012 साली भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार होती. त्याआधी धोनीने दोन फोटो शेयर करत दोघांमधला फरक ओळखायला सांगितला, त्यावर एका ट्रोलरने धोनीला बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. यानंतर धोनीने या ट्रोलरलाच मला बॅटिंगच्या टिप्स दे असं प्रत्युत्तर दिलं. धोनीचं हे जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
First published:

Tags: Cricket news, MS Dhoni, Team india

पुढील बातम्या